माझं कोकण

Spread the word

दर्‍याखोर्‍यातुन जाते माझ्या कोकणाची वाट
मला ओढुनिया नेते माझ्या दाराशी हि थेट

फणसासारखे मधुर इथल्या माणसांचे मन
राजापुरच्या गंगेमुळे भाविकही होती धन्य

कोकणात माझ्या निळा विस्तीर्ण सागर
मौज वाटे पाहण्यास मासोळ्यांचे सूर

लालबुंद या मातीत तांदुळ वरीची पिके
कोकणाचा हापुस आंबा ?अवघे जग जिंके

करवंद, जांभुळ, काजु हा तर कोकणी मेवा
निसर्गाने दिला जणु अनमोल ठेवा

पोटासाठी चाकरमानी मुंबईला जाई
परी शिमगा, गणपतीला परतुनी येई

माझ्या कोकणाची काय सांगु मी महती
दूर जाता कोकणासाठी डोळे पाणावती?

                                                   ???  ???