श्री अंबाबाईची नऊ दिवसांची विधिवत पूजा – शारदीय नवरात्री २०२१

Spread the word
१. ब्रम्हाणी मातृका रुपातील पूजा

शारदीय नवरात्र महोत्सवाचा पहिला दिवस –  घटस्थापना. परंपरेला अनुसरून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई ची पहिली बैठी पूजा, हंसा वर बसलेली ब्रम्हाणी रुपात बांधण्यात आलेली  होती.

२. माहेश्वरी मातृका रूपातील पूजा
माहेश्वरी अर्थात शुंभनिशुंभ वधाच्या प्रसंगी रक्तबीज दैत्याचा संहार करण्यासाठी भगवतीच्या सहावी अर्थ प्रत्येक देवाची मूर्तीमंत शक्ती प्रगट झाली त्या शक्तींना मातृका म्हणून ओळखले जाते या मातृका मंडलापैकी भगवान शंकरांची अर्थात महेश्वर यांची शक्ती म्हणजे माहेश्वरी भगवान शंकर हे सृष्टी क्रमामध्ये संहाराचे दैवत. संहार हा वाईट नसतो जे निर्माण होते ते कधी ना कधी नष्ट होते आणि जुने नष्ट झाल्याशिवाय नव्या निर्मितीला जागा उरत नाही तेव्हा सृष्टी चक्रामध्ये जितके महत्त्वाचे स्थान निर्मितीला केव्हा पालनाला आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान संहाराला आहे. भगवान शंकर कधी दैत्यांना वरदान देऊन देवांच्या दूर्गुणांचा संहार करतात तर कधी भक्तांना अभय देऊन त्यांच्या संसार चक्राचा शेवट करतात अशा या भगवान शंकरांची मूर्तिमंत शक्ती म्हणजे भगवती माहेश्वरी. हातामध्ये भगवान शंकरा प्रमाणेच त्रिशूल अक्षमाला अशी आयुधे, नंदी वाहन, माथ्यावरती चंद्रकोर जटामुकूट, कपाळावर त्रिनेत्र‌ अशी भगवती माहेश्वरी भक्तजनांच्या समस्त इच्छा पूर्ण करत त्यांच्या वासना वृत्तीचा संहार करते
३. कौमारी मातृका रूपातील पूजा

हि देवांचा सेनापती अथवा युद्ध देवता कार्तिकेयाची शक्ति आहे. हिला कुमारी , कार्तिकी किंवा अंबिका म्हणून हि ओळखले जाते. कौमारी मोरावर स्वार असून तिला चार / बारा हात असतात. तिच्या हातात भाला , कुऱ्हाड, शक्ति किंवा टांक आणि धनुष्य आहे.

४. गजारुढ अंबारीतील रूपातील पूजा

देव आणि दानव यांच्या युद्धामध्ये कामाक्ष राक्षसाने आपल्या योगदंडाच्या बळावर सर्व देवांना शेळ्या-मेंढ्या बनवले होते.देवी त्र्यंबोलीने ( टेंबलाई ) आपल्या चतुराईने कामाक्षा कडील योग दंड काढून घेऊन देवांना पूर्ववत केले व कामाक्षा बरोबर युद्ध करुन त्याचा वध केला. त्या विजया प्रित्यर्थ श्री महालक्ष्मी ( अंबाबाई ) ने विजय सोहळा आयोजित केला. परंतु या सोहळ्याचे त्र्यंबोली देवीला आमंत्रण द्यायचे राहून गेले.त्यामुळे सखी देवी त्र्यंबोली रुसुन पुर्वेकडील टेकडीवर जाऊन बसली. महालक्ष्मी ( अंबाबाई ) च्या हे लक्षात आल्यावर ती त्र्यंबोली देवी चा रुसवा काढण्यासाठी आजच्या ललिता पंचमी दिवशी तिला भेटायला गेली व तिचा रुसवा काढून दोघींची हृद्य भेट झाली.
५.वैष्णवी मातृका रूपातील पूजा
वैष्णवी मातृका ही पालनकर्ता भगवान विष्णूंची शक्ती आहे. ही गरुडावर बसलेली असून चार / सहा हात असलेली आहे. तिने शंख , चक्र , गदा व कमळ धारण केलेले आहे. विष्णू प्रमाणे ती दागिन्यांनी व किरीट मुकुटांनी सजलेली आहे.
६.इंद्राणी मातृका रूपातील पूजा
इंद्राणी मातृका ही देवांचा राजा इंद्र यांची शक्ती आहे. हिला ऐंद्री / महेंद्री किंवा वज्री असेही म्हणतात. ही चतुर्भुज असून हत्तीवर आरुढ झालेली आहे. तिच्या हातात वज्र, पाश व कमळ आहेत. विविध दागिन्यांनी सजलेली असुन मुद्रा आक्रमक आहे.
७.महिषासुरमर्दिनी रूपातील पूजा
दैत्य रंभासुर व महिषी (म्हैस) यांच्या मिलनातून महिषासुराचा जन्म झाला होता. तो ब्रम्ह देवाचा भक्त होता व घोर तपश्चर्येतुन त्याने ब्रम्हदेवाकडून मानव, देव व दानव यांच्याकडून अपराजित राहण्याचे वरदान मिळवले होते. या वरदानाने तो उन्मत्त झाला व त्र्यैलोक्यावर अधिराज्य मिळवले. देवदेवतांना त्याने हैराण करुन सोडले होते व जनतेवर अत्याचार करत होता. त्याला त्रासुन सर्व देवांनी ब्रम्हा, विष्णू व महेश यांच्याकडे धाव घेतली व महिषासुरापासुन सुटका करण्याची विनंती केली. तेव्हा ब्रम्हा, विष्णू व महेश या त्रिमुर्तिंनी आपल्या क्रोधातुन एक तेज / शक्ति प्रकट केली. ती साक्षात दुर्गा देवीच होती. तिला सर्व देव देवतांनी आपआपली अस्रे व शस्रे दिली. देवी दुर्गेने महिषासुराला आव्हान देउन दैत्य सेने बरोबर युद्ध पुकारले. आठ रात्री युद्ध करुन अष्टमीच्या रात्री तिने महिषासुराचा वध केला.
८.चामुंडा मातृका रूपातील पूजा
चामुंडा ही यमाची शक्ति आहे. हिला बऱ्याचदा काली चामुंडी म्हणुनही ओळखले जाते. ही कोल्ट्यावर आरूढ असून गळ्यामध्ये मुंडमाला तसेच हातात डमरू, त्रिशुळ, तलवार व वाडगा आहे. काही धर्मग्रंथामध्ये हिला शंकराची शक्ति मानली गेली आहे व वाघावर आरूढ असेही
दाखविण्यात आले आहे, हिचा रंग गडद लाल असुन रौद्र चेहरा आहे.
९.रथारूढ  अलंकार  रूपातील  पूजा

सौजन्य : VAM Photo Studio, कोल्हापूर.