Ratnagiri Hapus

600
जसा उन्हाळा सुरु झाला तसा सगळीकडे या ऋतूमध्ये उपलब्ध होणारी फळे विक्रीसाठी येण्यास सुरुवात झाली. 19 व्या शतकात ती सहज उपलब्ध होत होती. अगदी स्वतः झाडावरून तोडून खात असल्याच्या आठवणी डोळ्यासमोर येतात. अनेक फळे जणू आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे. ही देणगी 20 व्यां शतकात पण कायम ठेवलीय निसर्गाने पण बाजारातील वाढती मागणी व व्यापारातील शर्यती मुळे त्याच फळांवर वेगवेगळी रासायनिक प्रक्रिया केली जात असल्याचं आपल्या दृष्टीस पडत आहे. यासर्वांमध्ये हापूस आंबा हा उच्च स्तरावर आढळतो.
मनमोहक, स्वादिष्ट हापूस आंबा चवीला जितका गोड तितकाच तो औषधी आहे. शरीरातील उष्णतेचा प्रमाण आटोक्यात ठेवतो त्याच बरोबर पूर्ण वर्षासाठी शरीराची रोप्रतिकारक शक्ती वाढवतो. पण वाढत्या मागणीमुळे त्यावर केली जाणारी रासायनिक प्रक्रिया ही देखील आपल्या शरीरास तेवढीच घातक ठरत आहे. हापूस हे फक्त चवीसाठी खाण्याचे फळ बनले आहे.
मामाच्या बागेतले, आत्याच्या शेतातले नैसर्गिकरीत्या पिकविलेला हापूस अश्या कित्येक जाहिराती आपण सोशल मीडियावर पाहतोय. कच्चे आणि पूर्ण हिरवे आंबे carton box  व वाऱ्यावर पसरवून ठेवल्याचा छायाचित्रे सोबत असतात. तो खरच नैसर्गिकरीत्या पिकविला आहे का याचीही आपण माहिती घेतली पाहिजे.
१.हापूसची साल पातळ असते
२.साल सहज निघते
३.गर केशरी रंगाचा
४.सालीसोबत गर निघत नाही.
५.नैसर्गिकरीत्या पिकविलेला हापूस हा एप्रिल च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होतो. तसेच केमिकल युक्त हापूसचा रंग पिवळा आणि चकचकीत असतो.
६.हापूस हातात घेताच तो गरम लागतो.
७.नैसर्गिकरीत्या पिकविलेला हापूस कितीही पिकाला तरी तो पूर्णपणे पिवळा न होता थोडासा हिरवट राहतो.
८. केमिकल मध्ये पिकविलेला हापूस हा हवेला पसरून ठेवलेला आढळतो. त्याचा अवती भोवती कुठेच पिंजर, गवत पाहायला मिळत नाही.
९.हापूस नैसर्गिक रित्या पिकवला तर हापूस चा सुगंध सर्वत्र दरवळतो. नाकाजवळ घेवून पाहण्याची गरज नसते.
       आणि हाच मनमोहक सुगंध ठरवेल हापूसचा दर्जा, त्याचा सुगंध हेच हापूसचे एकमात्र प्रमाणपत्र.
नैसर्गिकरीत्या पिकावण्याची पद्धत
१.पिंजरात किंवा गवतात. (अढी लावणे, व्यापारी पद्धत)
२.धान्याच्या राशीत ठेवणे.(घरगुती पद्धत)
३.गोनीचा वापर.
खात्री करा आणि मगच खरेदी करा…
५००₹ लहान फळ
६००₹ मध्यम फळ
७००₹ मोठे फळ
संपर्क:
आर.आर.फ्रूट वर्ल्ड, घोलपे हॉस्पिटल नाजिक, रंकाळा स्टँड, कोल्हापूर.(live on google map)
9028929908/8208420119
माऊली मिल्क शॉपी अँड प्रोडक्ट्स, लाड चौक , न्यू महाद्वारोड, कोल्हापुर.7057549393
error: Content is protected !!