मराठीतून इंग्रजी शिका

Spread the word

मराठीतून इंग्रजी शिका

#lmklearningenglish
#Simple_present_tense
#Lesson 1

साधा वर्तमान काळ
एखादे नैसर्गिक सत्य , एखाद्याची वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात.
उदाहरण / तो सकाळी लवकर उठतो.
रात्री उशिरा झोपतो
सूर्य पूर्वेला उगवतो

(काळ ओळखण्यासाठी महत्त्वाची टीप-मराठीत वाक्याच्या शेवटी तो,ते ,त,ता तं,तोस,तेस यापैकी कोणते अक्षर असल्यास वाक्य साध्या वर्तमान काळाचे असतं.)

हे साध्या वर्तमान काळाचे मराठी वाक्याचे सर्वसाधारण लक्षण आहेत, तो,ते,त ही अक्षरं नसलेले वाक्य ही साध्या वर्तमान काळाचे असू शकत,हे सगळं पुढे स्पष्ट होईलच तोपर्यंत काळाची वर दिलेली ओळख लक्षात ठेवणे पुरेसे आहे.

पुढील भागात शिकूया simple present tense ची वाक्य बनवणे.

(संकलन — लेक माहेरचा कट्टा)