लेक माहेरचा कट्टा

Spread the word

‘एकत्र आलेली माणसं’ एवढा एकच अर्थ आपणास ‘समुह’ म्हणून अभिप्रेत असतो. खरंतर समुह म्हटले की, त्यात येतं ते परस्परावलंबित्वाचे नाते, संवाद आणि आंतरक्रिया. माणसे समुहात आली की, त्यांचा परस्परांशी संपर्क आणि संवाद होऊ लागतो. समुहाचे सदस्य म्हणून त्यांना परस्परांबद्दल आत्मियता वाटू लागते. अभिरुचीप्रमाणे जवळपास सर्वच सजीव कोणत्या ना कोणत्या मार्गाने विविध गोष्टी व्यक्त अथवा अभिव्यक्तीचे प्रकटीकरण करण्याकरीता धडपडत असतात. आपली संवादाची आणि अभिव्यक्त होण्याची हीच धडपड ओळखत विशेष करून महिलांना अभिव्यक्त होता यावे याकरिता एक सुंदर व कल्पक विचारानिशी मान. सौ. सारिका प्रमोद ढाणे यांनी एक फेसबुक समुह ७ जुलै २०१७ मध्ये “लेक-माहेरचा कट्टा” या नावाने सुरू केला.

महिलांची सामाजिक सुरक्षितता, समस्या व त्याचे निवारण केंद्रस्थानी असलेला, एकमेकींचे सुख आणि दुःख, हितगुज सखींसोबत वाटून घेणारा हा समुह पुढे महिलांना उद्योजक व्यासपीठ उपलब्ध करवून देत स्वावलंबनाकडे प्रेरीत करतांना दिसतो. समुहात महिला सदस्यांची एकूण संख्या २,८०,००० (दोन लाख ऐंशी हजार) एवढी असून इतक्या मोठ्या संख्येने ‘केवळ महिलांचा’ सहभाग असलेला हा फेसबुकवरील सर्वात मोठा समुह ठरतो. येथे महिला सदस्य त्यांच्या कौटुंबिक, सामाजिक, आरोग्य व कायदेविषयक समस्या आणि प्रश्न मांडतात. या दिशेने समुहात त्या-त्या क्षेत्रातील तज्ञ व समुपदेशकांचा समावेश आहे. जे समुहातील महिला सदस्यांना मार्गदर्शन करीत असतात.

लेकीचं “माहेर” म्हणजे तीचं शीतल, थंडगार सावलीचं ठिकाण. इथे तिचे गोड कौतुक व लाड होतात. अल्पावधीतच हा समुह भरभराटीस आला. पूर्णत: महिलाप्रधान हा समूह आहे. समुहाने महिला सदस्यांना ‘स्वयं रोजगाराची संधी’ उपलब्ध करवून देण्याकडे, ‘महिला उद्योजक’ घडविण्यात पुढाकार घेत प्रशासक व्यावसायिकांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचं अवघड काम खुप छान रितीने करतांना दिसून येतात. मुख्य म्हणजे दोन्ही समुहाची सदस्य संख्या ही तीन लाखाच्यावर असून समुहात एकत्रचं सांस्कृतिक कार्यक्रम व विविध उपक्रम राबविले जातात.

एक सुंदर व कल्पक विचारांनी तयार केलेला हा लेक-माहेरवाशीनींचा-मनाला खुपचं भावनारा आहे. सख्यांशी खुप बोलावं असं प्रत्येक माहेरवाशीनीला वाटत असतं ती उणीव भरारीने भरुन काढली. ह्यात माय-लेकीचे नातेच नाहीतर; प्रत्येक नात्यांबद्दल असलेला जिव्हाळा तसेच वेगवेगळ्या व्यक्तिमत्वाबद्दलचा आदर, स्त्रीयांच्या समस्या व त्यांचे समाधान, वेगवेगळ्या विचारांची देवाण-घेवाण, मनाला स्पर्श करणारे लेख, छायाचित्रे, सुविचार, त्यावर आवड व प्रतिक्रिया देणारे, समुहाची शान असलेल्या मनकवड्या सदस्यांची प्रशंसा व कौतुक करावे तेवढे कमीच आहे. म्हणूनच म्हणावंसं वाटतं, हा समुह, समुह नसून एक परिवारच आहे. जिथे नियम हे अनुशासन, कायदा नाही तर व्यवस्था, सूचना नाही तर समज, भय नाही तर भरोसा, आग्रह नाही तर आदर, संपर्क नाही तर नातेसंबंध, अर्पण नाही तर समर्पण आहे.


“मनातल्या गोष्टी मनमोकळेपणानं व्यक्त करता येणा-या अशा या परिवारास एकसूत्रात बांधून ठेवणा-या ह्या उत्तम व्यासपीठात तुम्हा सर्व लेकींचे मनपूर्वक स्वागत!”
  • – नरेंद्र गायकवाड 

(“लेक माहेरचा कट्टा “ग्रुप मध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.)

https://www.facebook.com/groups/1854819241499289/?ref=pages_group_cta