पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली होती. त्यानुसार आजपासून आरोग्य कर्मचारी तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस
देण्यास देखील सुरुवात झाली आहे. देशभरात सध्या लसीकरण वेगानं सुरु आहे. सर्वांना लसीचे दोन डोस दिले जात आहेत. मा त्या पार्श्वभूमीवर अनेक देशात बूस्टर डोस देण्यात येत आहे. आता भारतातही बूस्टर डोस देण्यात येणार आहे. 10 जानेवारीपासून आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर तसंच 60 वर्षांवरील नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. आपण एखाद्या रोगावरची लस घेतो, तेव्हा आपण आपल्या शरीरातल्या रोगप्रतिकारक शक्तीला त्या रोगाशी कसं लढायचं याचं शिक्षण देतो. पण काही वेळा लशीचे एकापेक्षा जास्त डोस घ्यावे लागतात. लशीचा प्राथमिक डोस घेतल्यानंतर दिल्या जाणाऱ्या प्रत्येक डोसला बूस्टर डोस’ असं म्हटलं जातं. लशीचे प्राथमिक डोस घेतल्यानंतर शरीरात तयार झालेली रोग प्रतिकारक शक्ती काही काळाने हळुहळू कमी व्हायला लागते. ही रोग प्रतिकारक्षमता पुन्हा वाढवण्यासाठी लशीचा बूस्टर डोस दिला जातो. यामुळे रोग प्रतिकारक्षमा दीर्घकाळ टिकायला मदत होते असं संशोधनातून समोर आलंय.
बूस्टर डोस कोणाला मिळणार? अनेक देशांमध्ये सगळ्या नागरिकांना बूस्टर डोस द्यायला सुरुवात झालेली आहे. भारतामध्ये डॉक्टर्स, आरोग्यसेवक, फ्रंटलाईन वर्कर्स आणि 60च्या वर वय असणाऱ्या, सहव्याधी असणाऱ्या लोकांना बूस्टर डोस घेता येईल. 60 पेक्षा जास्त वय आणि सहव्याधी असलेल्या लोकांना त्यांच्या डॉक्टरांच्या सल्लानंतर बूस्टर डोस दिला जाईल. 10 जानेवारीपासून बूस्टर डोस द्यायला सुरुवात झाली आहे. Booster Dose in Marathi
रजिस्ट्रेशन करावं लागेल का?
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बूस्टर डोस घेण्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणं गरजेचे नाही. त्यांच्याकडे दोन पर्याय आहेत. सुरुवातीला ते Cowin APP वर जाऊन वेळ घेऊ शकतात. या App वर बूस्टर डोसची वेगळा पर्याय दिला आहे. त्याठिकाणी सुलभपणे तुम्ही वेळ घेऊ शकता. दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही थेट लसीकरण केंद्रावर जात लसीकरण करुन घेऊ शकता. त्याठिकाणीही दुसऱ्यांदा रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही.
बूस्टर डोस म्हणजे काय? कोणाला मिळणार
लस कुठं घ्यायची? पात्र लोक ज्यामध्ये आरोग्यसेवा कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व्याधी असलेल्यांचा समावेश आहेत, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, ते कोणत्याही लसीकरण केंद्रात जाऊन बूस्टर डोस घेऊ शकतात. हा बूस्टर डोस घेण्यासाठी कोविनवर स्लॉट बुक करणे गरेजेचे नाही. Booster Dose in Marathi
लसीकरण केंद्रावर प्रमाणपत्र दाखवावं लागेल? जर तुमचं वय 60 वर्षापेक्षा जास्त आहे आणि तुम्ही इतर आजाराने त्रस्त आहात तर विना रजिस्ट्रेशन अथवा प्रमाणपत्र लसीचा डोस घेऊ शकतो. परंतु आरोग्य मंत्रालयाने तिसरा डोस घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या असं सांगितले आहे.
बूस्टर डोसनंतर लसीकरण प्रमाणपत्र मिळेल?
होय, नेहमीप्रमाणे जर तुम्ही कोरोना लसीचा तिसरा डोस घेतला असेल तर तुमचं प्रमाणपत्र रजिस्टर्ड मोबाईलवर पाठवलं जाईल. त्यात जन्मतारीख आणि अन्य
महत्त्वाची माहिती असेल. बूस्टर डोस घेताना कोणती लस घ्यायची? बुस्टर डोस देताना या आधी जी लस घेतली आहे, त्याच लशीचा बुस्टर डोस देण्यात येणार
असल्याचे केंद्राने स्पष्ट केले आहे. ज्या लोकांनी कोव्हॅक्सीनची लस घेतली आहे, अशांना कोव्हॅक्सीनचाच बुस्टर डोस देण्यात येईल तर ज्यांनी कोव्हिशील्ड लस घेतली आहे, अशांना कोव्हिशील्डचाच बुस्टर डोस देण्यात येईल. Booster Dose in Marathi
किती कालावधीनंतर बूस्टर डोस घेऊ शकता?
जर तुम्ही कोरोना लसीचा दुसरा डोस 9 महिन्यापूर्वी घेतला आहे. तर तिसऱ्या डोससाठी नोंदणी करु शकता. जर दुसरा डोस घेऊन 9 महिन्यापेक्षा कमी कालावधी झाला असेल तर बूस्टर डोससाठी वाट पाहावी लागेल.