अळूवडी

Spread the word
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

 

अळूवडी

साहित्य :

आळूची कोवळी पाने – ५ ते १० ( मध्यम आकाराचे )
बेसन – १ कप
तांदळाचे पीठ – १/२ कप
गुळ – १/२ मोठा चमचा (बारीक केलेला )
तेल – १ मोठा चमचा
हिंग – चिमटीभर
ओवा – १ छोटा चमचा
हळद – १ छोटा चमचा
धणेपूड – १ छोटा चमचा
लाल तिखट – १ छोटा चमचा किंवा आवश्यकतेनुसार
जिरे – १छोटा चमचा
हलके भाजलेले तीळ – १ मोठा चमचा
कोथिंबीर – १/४ कप (बारीक चिरलेली )
मीठ – चवीपुरते
कृती :
सर्वप्रथम आळूच्या पानांना चांगले धुऊन, त्याच्या दांड्या तोडून बाजूला ठेवा .
आता एका भांड्यात बेसन घ्या त्यात तांदळाचे पीठ, कोथिंबीर , तेल , जिरे, हिंग, हळद , धणेपूड , लालतिखट , तीळ, गूळ , व मीठ टाकून थोडे थोडे पाणी टाकीत घट्ट आसे मिश्रण तयार करा .
एक आळूच पान घ्या, उलटी बाजूने टोक खालच्या राहील असे ठेऊन त्यावर तयार मिश्रणाचा हाताच्यामदतीने एक हलका थर लावा . व आणखी एक आळूचे पान घेऊन उलटे त्यावर ठेवा . व त्यावरही मिश्रण लावा
असे ४ ते ५ पाने एकावर एक लावून उजव्या आणि डाव्या बाजूच्या कडा मोडून घ्या . व त्यावरही मिश्रण लावा .
आता वरच्या बाजूने मोडीत पानांची गोल घडी तयार करा .
तयार पानांना वाफवण्यासाठी प्रेशर कुकर मध्ये खालच्या भांडयात पाणी घेऊन त्यावर एखाद प्लेट ठेवा व सर्व पानांच्या घड्या त्यावर ठेवा .
प्रेशर कुकरच झाकण विना सिटीचा लावून घ्या . व १५ मिनिटे वाफवा .
नंतर चाकूच्या मदतीने छोटे छोटे स्लाइस कापून घ्या .
पॅन मध्ये तेल ग्राम करायला ठेवा व तयार वड्या हलका तपकिरी रंग होईपर्यंत तळून घ्या .
तुमच्या अळूच्या वड्या तयार आहेत, गरमा गरम सर्व करा.