सब्जा-सब्जा मध्ये बरेच गुणधर्म आहे ते बघूया

Spread the word

उन्हाळ्याची सुरवात झाली तशी उन्हाळ्याचा कडाका वाढत चालला आहे. आपण काही कामानिमित्त म्हणा किंवा नोकरी निमित्त म्हणा बाहेर पडतो आणि उन्हाचा सामना करावा लागतो. सुर्या चे किरणे सरळ पृथ्वीच्या मध्यावर येत असल्याने उष्णतेचे प्रकार वाढत चालले आहे.अशातच काही लोकांना ऊन बाधण्याचे प्रमाण ही जास्त होत चालले आहे अशातच मग तोंडात उष्णता उभवणे, नाकातून रक्त येणे, शरीरावर उष्णतेचे परिणाम दिसून येणे आशा अनेक समस्या जाणवायला लागतात.यावर उपयुक्त उपाय म्हणून सब्जा बी देखील आहे.सब्जा हे चवीला गोड असत आणि ते शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देते.भरपूर प्रथिने असलेला सब्जा बी हे प्रथिने युक्त आहे .यात फायबर ओमेगा फॉलिक ऍसिड कॅल्शियम मॅग्नेशियम लोह आणि जीवनसत्त्व ए आणि सी हे भरपूर प्रमाणात आढळतात.
सब्जा मध्ये बरेच गुणधर्म आहे ते बघूया
१. सब्जा मुळे प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
२.सब्जा मध्ये कॅलरीज चे प्रमाण जास्त असते
३.सब्जा मध्ये अल्फा लिनीलेनिक ऍसिड असते ते वजन कमी करण्यास मदत करते.
४.त्वचा विकारासाठी सब्जा बी खूप गुणकारी आहे त्यामुळे त्वचा निरोगी आणि राहते तसेच सुरकुत्या कमी होऊन त्वचा तसजेलदार आणि तुकतुकीत होते.
५.सब्जा बी रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी सब्जा खाल्ला तर फायदेशीर आहे.
६.सब्जा बी सेवनाने हाडांची मजबुती वाढते
७.पोट साफ होण्याचा प्रॉब्लेम असेल तर सब्जा बी पाण्यात भिजवून ते पाणी सेवन करावे.
सब्जा हा पाण्यात, मिल्कशेक, फालुदा, ताक, दही, सरबत मध्ये टाकून खातात. सब्जा हा नुसता खण्यापेक्षा पाण्यात टाकून खाल्ला तर खुप फायदेशीर परिणाम दिसून येतात कारण पाण्यात सब्जा बी पाण्यात फुगून गुणधर्म द्विगुणीत होतात.
महत्वाचे म्हणजे गरोदर महिलांनी सब्जा खाणे टाळावे कारण त्याने हार्मोन्स चे संतुलन बिघडते तसेच लहान मुलांना देखील कमी प्रमाणात सब्जा द्यावा अन्यथा जुलाबाची समस्या उद्भवू शकते.