संताची शिकवण

Spread the word

 

तुम्हाला खरे सुख आणि आनंद मिळवायचा असेल तर लक्षात ठेवा या संताची शिकवण

रिलिजन डेस्क. प्राचिन काळी एक संत भिक्षा मागत होते. ते एका घराबाहेर पोहोचले, तेथील महिला त्यांच्यासाठी जेवण घेऊन आली. जेवण देताना तिने संताला विचारले की, महाराज आनंद आणि खरे सुख मिळवण्याचे उपाय काय आहे? कोणत्या मार्गाने चालल्यानंतर आपल्याला हे दोन्हीही मिळू शकते? संत म्हणाले याचे उत्तर मी तुला उद्या देईल.
– दुस-या दिवशी सकाळी महिलेने संतासाठी खीर बनवली. कारण तिला संतांकडून सुख आणि आनंदाविषयी उपदेश ऐकायचा होता.
– संताने भिक्षेसाठी महिलेला आवाज दिला. महिला खीर घेऊन बाहेर आली. संताने खीर घेण्यासाठी आपले कमंडल पुढे केले. महिला खीर देत होते, तेव्हा तिची नजर कमंडलवर पडली. हे कमंडल आतून खराब होते. ती म्हणाली की, महाराज तुमचे कमंडल खुप खराब आहे.
– संत म्हणाले हो हे खराब आहे, पण तरीही तु यामध्येच खीर टाक.
– महिला म्हणाली, असे नाही महाराज यामुळे खीर खराब होईल. तुम्ही कमंडल द्या मी धुवून स्वस्छ करुन देते.
– संतांनी विचारले की, जेव्हा कमंडल स्वच्छ होईल तेव्हाच तु यामध्ये खीर देशील?
– महिलेने उत्तर दिले – हो महाराज हे स्वच्छ केल्यानंतरच मी तुम्हाला यामध्ये खीर देईल.
– संत म्हणाले की, बरोबर याचप्रकारे जोपर्यंत आपल्या मनात काम, क्रोध, लोभ, मोह, वाईट विचारांची अस्वच्छता आहे, तोपर्यंत आपण यामध्ये उपदेश कसे टाकू शकतो. जर आपण असेच यामध्ये उपदेश टाकले तर त्याचा योग्य परिणाम होणार नाही. यामुळे उपदेश ऐकण्यापुर्वी आपले मन शांत आणि पवित्र करायला हवे. तेव्हाच आपण ज्ञानाच्या गोष्टी ग्रहण करु शकतो. पवित्र मन असणारेच खरे सुख आणि आनंद प्राप्त करु शकतात.
– महिलेला समजले की, जेव्हा आपण आफले मन पवित्र बनवू तेव्चा आपल्याला खरे सुख आणि आनंद प्राप्त होऊ शकते.