संक्रांति स्पेशल उखाणे

Spread the word

संक्रांत म्हटले की उखाणे आले खास तुम्हा सर्वांसाठी घेऊन येत आहोत संक्रांति स्पेशल उखाणे

1) तिळाचा स्नेह गुळाची गोडी,
सदा सुखात राहो ……. जोडी.

2) तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत,
…….रावांचं प्रेम हेच माझ्या सुखाच गुपित.

3) नवीन वर्ष सण पहिला मकरसंक्रातीचा मान
हळदीकुंकूवाचा मान सुवासिनींचा.. आणि ………’चा जोडा राहो साताजन्माचा…

4) संक्रांतीचा जन्म माझा,….. रावांचे नाव घेवून वाटते तिळगुळाचा गोडवा.

5) संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली …..रावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली

6) कुकू लावते ठळक हळद लावते किचीत ….. राव हेच माझे संचित

7) अबोलीच्या मुग्ध काळ्या सांगून गेल्या मनीचे
…..च नाव घेते सानिध्य आहे मकरसंक्रांतीच्या हळदी कुंकवाचे…….???

8) तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी
…….रावांची ……मी राणी

9) समोर होती देवळी
देवळीत होते वाटी
वाटीत होते आवळा आवळी
…ने पीचर दाखवले पळवापळवी

10) निसर्गाच्या सानिगध्यात निशीगंध झाला मोहीत ……रावांच आयुष्य मागीतले सासू सासऱ्या सहीत

11) हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि… रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी…

12) मुकेश आंबानीच्या बायकोचा संक्रांतीचा उखाणा…….

रेडमी घ्या… ओप्पो घ्या….
की मोबाईल घ्या वीवो……..
.

.
.
.
.
मुकेशरावांचे नाव घेते फुकट वापरा जीओ…
???????

13) नंदन वनात नाग नागिणीची वस्ती ……. राव यांना आयुष्य मागते माझ्या पेक्षा जास्ती

14) संसारुपी सागरात पती असावे हौशी ……. राव च़ नाव घेते संक्रांतीदिवशी
??

15) तिळासारखा स्नेह. गुळासारखी गोडी. …..रावांच नाव घेते. सुखी असावी जोडी

16) संसार रुपी करंजीत प्रेम रुपी सारण …….रावांचे नाव घेते आज आहे संक्रांतीच्या हळदी कुंकू चे कारण

17) संक्रांतीच्या दिवशी पतंग उडवते आकाशात ….रावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात

18)हळदी कुंकु घेतले चाँदीच्या ताटी,
……. ची जोड़ी अशी जशा जुळून येती रेशीमगाठी।

19)संक्रांतीच्या सणाला नटुन थटुन करते वानववसा
………रावांनी आनंद सुखाने भरुन दिला पसा

20)माझ्या संसाराला नजर ना लागो कुणाची …
….रावांचे नाव घेतेय,संक्रांति च्या दिवशी.

21)सासु आहे प्रेमल ननंद आहे हौशी ….. रावांचे नाव घेते मकर संक्रांति च्या दिवशी.

22)मंगलकार्याची खूण म्हणजे दाराला तोरण…
…रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाचे कारण

23)उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला …..रावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळेला

24)हिवाळ्यात लागते थंडी, उन्हाळ्यात लागते ऊन…… रावांच नाव घेते …..सुन..

25)नाव घ्या. नाव घ्या. आग्रह. असतो सर्वाचा,
….. रावांचे नाव. असते. ओठावर. पण प्रश्न. असतो. उखाण्याचा

26)गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत
…..रावांच नाव घेते संक्रातच्या पुजेत

27)कोल्हापूरचा चिवडा,
लोणावळ्याची चिक्की,
……रावासमोर सर्व दुनिया फिकी.

28)हिमालय पर्वतावर बरफाच्या राशि… रावाचं नाव घेते मकरसंक्रांति च्या दिवशी…

29)पेरूच्या झाडावर पोपट बसले पंगतीला,
……रावांचे नाव घेते,
सुहासिनीच्या संगतीला

30)वाण घ्या वाण संक्रांतीचे वाण…..
…..रावामुळे मिळतो हळदी कुंकुवाचा मान

31)रुसलेल्या राधेला क्रीषण म्हणते हास रावांचे नाव घेते संक्रांतीला खास.

32)निसर्ग निर्मिती च्या वेळी
सूर्यनारायण झाले माळी
——- चे नाव घेते संक्रातीच्या वेळी

33)यमुनेच्या पाण्यात ताजमहालाची सावली
—- ना जन्म देऊन धन्य झाली माउली

34)तिळगुळ घ्या आली संक्रांत
— माझ्याबरोबर मला कसली भ्रांत

35)घरच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण ,
……रावांचे नाव घेते संक्रांतीचे कारण

36)तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान…
…चे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण…

37)तिळाच्या लाडू सोबत देते काटेरी हलवा…
…..चे नाव घेते त्यांना लवकर बोलवा..

38)तिळगुळ घ्या गोडगोड बोला
—– शी लग्न झाले वर्ष झाले सोळा

39)तिळगुळ घ्या आली संक्रांत
— शी झाले लग्न स्वभावाने फारच शांत

40)तिळगुळ घ्या आली संक्रांत
— शी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत