वातावरण बदललं की सगळ्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्धवतो.

Spread the word

वातावरण बदललं की सगळ्यांना सर्दी-खोकल्याचा त्रास उद्धवतो. हिवाळा आणि पावसाळ्यात 80% लोकांना सर्दी-खोकला हा ठरलेला अशतो. या ऋतूत सगळे या सर्दी-खोकल्यावर वेगवेगळे उपाय शोधत असतात. सर्दी-खोकला झाला की आपण खूपच अस्वस्थ होतो. हा काही गंभीर आजार नाही. यावर औषधांचाही कमी परिणाम होतो. जाणून घेऊया सर्दी-खोकल्यासाठी खास घरगुती उपाय…

फुटाणे खा-

खोकला येत असेल आणि छातीत कफ साठला असेल तर मुठभर फुटाणे खायला द्यावेत. हे खाल्ल्यानंतर तासभर पाणी पिऊ नये. हे फुटाणे सगळा कफ शोषून घेतात. ह्याने खोकला कमी होतो.

कांद्याचं पाणी-

लहान बाळांना सर्दी व खोकला झाला असेल तर 1 छोटा कांदा बारीक चिरून घ्यावा. तोच कांदा ३ कप पाण्यात उकळत ठेवा. तो काढा उकळून अर्धा झाल्यावर त्याला पिवळा रंग येईल. त्यात थोडी चवीपुरती साखर घालून तो काढा दिवसातून 3-4 वेळा गरम किंवा कोमट करून बाळाला पाजावा. ह्या काढ्यामुले छातीत साठलेला कफ उलटी होऊन किंवा शी मधून बाहेर पडतो. छातीतून येणारा आवाज बंद होतो.

दूध आणि हळद-

गरम पाणी किंवा गरम दूधात एक चमचा हळद घालून प्यावी. सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. हा उपाय फक्त लहान मुलांसाठी नाही तर मोठ्यांसाठीही उपयुक्त ठरतो. हळद अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरिअल असते, जी सर्दी-खोकल्याशी लढण्यास मदत करते.

आल्याचा चहा-

आल्याचे तर तसे अनेक फायदे आहेत. मात्र आल्याचा चहा सर्दी-खोकल्यात खूप आराम देतो. सर्दी-खोकला किंवा ताप असेल तर ताजं आलं छान बारीक करून घ्यावं आणि त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळावं. काही वेळ ते उकळल्यानं ते प्यावं.

लिंबू आणि मध-

लिंबू आणि मधाचा वापर सर्दी-खोकल्या उपयुक्त ठरतो. दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस एक ग्लास कोमट पाण्यात किंवा गरम दूधात मिसळून प्यावं, खूप फायदा होतो.

तुळशीचा पाल्याचा काढा-

4 तुळशीची पाने, 3 लवंगा, 2 वेलदोडे, दालचिनीचे छोटे तुकडे, थोडासा गवती चहा, 4 कप पाण्यात उकळा. पाण्याचा रंग बदलला की त्यात साखर घाला आणि हा काढा प्यायला द्या.

तुळशीचा पाला खा-

बाळंतिणीने रोज 5 ते 7 तुळशीची पाणी खाल्ल्यास जन्म झालेल्या बाळाला सर्दी खोकला होत नाही. त्याचबरोबर लहान मुलांना अर्धा चमचा तुळशीच्या पानांचा रस अर्धा चमचा मधासोबत रोज २ वर्षापर्यंत दिल्यास छातीच्या रोगापासून संरक्षण होते.