लाइफ मॅनेजमेंट-4

Spread the word

गरीब तरुणाला मालकाने दिले झाडे तोडण्याचे काम, पहिल्या दिवशी त्याने तोडली 17 झाडे, त्यानंतर तोडली दहा झाडे… त्यावर तो म्हणाला, मी दिवसभर मेहनत करतो, परंतू माझ्याकडून जास्त झाडे का नाही तोडली जात?…

एका गावात एक गरीब घरातला तरुण होता. लहानपणीच त्याच्या आई-वडीलांचे निधन झाल्यामुळे त्याला स्वत:च्या गरजा भागवण्यासाठी काम करावे लागत होते. त्याचे शिक्षण न झाल्यामुळे त्याला नोकरी मिळत नव्हती. मग त्याने विचार केला की गावातच राहून पैशे कमवता येऊ शकतात. कामाच्या शोधात तो तालुक्याच्या ठिकाणी गेला.
तिथे गेला असता त्याला एका व्यापाऱ्याने जंगलातील झाडे तोडण्याचे काम आणि दोनवेळेचे जेवन दिले. दुसऱ्याच दिवसापासून तो जंगलात जाऊन झाडे तोडू लागला. पहिल्या दिवशी त्याने 17 झाडे तोडली. त्याच्या या मेहनतीने त्याचा मालकदेखील प्रभावी झाला आणि त्याला भेटवस्तू दिली. खूश होऊन त्या तरुणाने आणखी जास्त काम करण्याचे ठरवले परंतू त्या दिवशी त्या तरुणाने 13 झाडे तोडली. यामुळे तो थोडा निराश झाला.

तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा तो जंगलात गेला. परंतू त्या दिवशीही त्याने दहाच झाडे तोडली. त्याने खूप विचार केला की दररोजपेक्षा कमी झाडे का तोडली जात आहे. घरी आल्यानंतर त्याने मालकाला विचारले की, मालक मी पहिल्या दिवशी 17 झाडे तोडली तेवढीच मेहनत मी आज केली परंतू मी आज दहाच झाडे तोडू शकलो असे का होत आहे?
त्यावर मालकाने तरुणाला विचारले की, ‘तु कुऱ्हाडीला धार लावली होतीस का?’
तरुण, ‘नाही मालक, कामामुळे मला वेळच भेटत नाही…’
मालक, ‘हेच तुझ्या प्रश्नाचे उत्तर आहे त्यामुळेच तु दिवसेंदिवस कमी झाडे तोडतो आहेस.’
तात्पर्य- या छोट्याशा गोष्टीपासून ही शिकवण मिळते की, कुऱ्हाडीच्या धारेप्रमाणेच आपल्या बुद्धीला देखील ज्ञानाची धार लावायला हवी. ज्याप्रमाणे गोष्टीतील तरुणाला त्याच्या मेहनतीचे कमी मोल मिळत होते अगदी त्याचप्रमाणे आपण आपल्या कौशल्यांना पारखले नाही तर यश मिळणार नाही