लाइफ मॅनेजमेंट-3

Spread the word

शेठजी नदीत बुडत होता, त्याने मासेमाराकडून मदत मागितली आणि म्हणाला मला वाचव, माझी सर्व संपत्ती तुला देईल, मासेमाराने त्याला नावेत बसवले, थोड्या वेळाने शेठजी म्हणाला पुर्ण संपत्ती देऊ शकत नाही, माझी पत्नी रागवेल

एक शेठजी नावेतून नदी पार करत होता. रस्त्यात त्याच्या नावेला छिद्र पडले आणि तो बुडू लागला. त्याने एक मासेमाराला पाहिले आणि त्याला आवाज देत मदत मागितली. शेठजी मासेमाराला म्हणाला की, मला वाचव माझी सर्व संपत्ती तुला देईल. मासेमाराने शेठजीला नावेत बसवून घेतले.
– थोड्या वेळानंतर शेठजी विचार करु लागला की, मी जरा जास्तच बोललो. संपुर्ण संपत्ती दिली तर मी काय करणार. तो मासेमाराला म्हणाला की, भाऊ तु वाईट वाईट वाटून घेऊ नको, पण मी माझी सर्व संपत्ती तुला देऊ शकणार नाही. माझी पत्नी रागवेल. मासेमार काहीच म्हणाला नाही.
– शेठजी पुन्हा विचार करु लागला की, याने कुठे मोठे काम केले आहे, याने तर फक्त मला वाचवले आहे. हे तर याचे कर्तव्य आहे. माणुसकी म्हणून त्याने मला वाचवायलाच पाहिजे होते. या छोट्याशा कामासाठी एवढी संपत्ती मी देऊ शकत नाही. मग तो पुन्हा मासेमाराला म्हणाला, माझी पत्नी आणि मुलंही आहेत. मला त्यांची देखरेख करायची आहे. यामुळे मी तुला एक चतुर्थांश संपत्ती देईल.
– मासेमार गप्प होता. थोड्यावेळानंतर नाव किना-यावर पोहोचली आणि दोघंही नावेतून उतरले. जाता-जाता शेठजीने मासेमाराला फक्त 5 स्वर्ण मुद्रा दिल्या. मासेमार म्हणाला की, शेठजी हे तुम्हाला ठेवा, मला काहीच नको. हे तर माझे कर्तव्य होते. शेठजीने मान्य केले नाही आणि 5 मुद्रा देऊन निघून गेला.

कथेचे तात्पर्य
आपण एखादे चांगले काम करण्याचा विचार करत असू तर तात्काळ करुन दिले पाहिजे. कारण जस जसा वेळ पुढे जातो, ते काम करण्याचा विचार आपण सोडून देतो. मासेमाराने चांगले काम तात्काळ केले आणि शेठजीचे प्राण वाचवले. पण शेठजी विचार करु लागला, त्याचे मन बदलू लागले आणि त्याने आपले बोलणे पलटवले. आपल्या मनाला वाईट काम लगेच करावे वाटतात, आपण तात्काळ रागावतो. पण चांगले काम टाळून देतो. वाईट काम टाळले पाहिजे आणि चांगले काम तात्काळ केले पाहिजे. तेव्हाच आपण सुखी होऊ शकतो.