लाइफ मॅनेजमेंट-2 साधू आणि शेठ

Spread the word

एक शेठजी एका विद्वान संताजवळ जाऊन म्हणाले – माझे मन नेहमी अशांत राहते, मी काय करु? शेठजीचे बोलणे ऐकून संतांनी अग्नी प्रज्वलित करुन त्यामध्ये लाकडे टाकली, त्यांनी असे का केले?

एका नगरामध्ये विद्वान संत राहायचे. लोक त्यांच्याकडे आपापल्या समस्या घेऊन जायचे आणि समाधान मिळवून आनंदी व्हायचे. एकदा एक शेठजी संतांजवळ गेले आणि म्हणाले – मला कोणत्याच गोष्टीची कमी नाही, तरीही माझे मन अशांत राहते. मी काय करु कृपया मला सांगा?
– हे ऐकताच संत उठले आणि चालू लागले. शेठजीही त्यांच्या मागे गेले. आश्रमाच्या एका रिकाम्या कोप-या जाऊन संतांनी आग लावली आणि हळुहळू त्यामध्ये लाकडं टाकण्यास सुरुवात केली. प्रत्येक लाकडासोबत त्यामधील अग्नी वाढत गेला. काही वेळानंतर संत पुन्हा आपल्या जागेवर येऊन बसले.
– शेठजीही संताजवळ येऊन बसले. खुप वेळानंतर संत काहीच बोलले नाही तेव्हा शेठजीने विचारले की, महात्मा, मी तुमच्या उत्तराची प्रतिक्षा करतोय. संत स्मित हास्य करत म्हणाले की, एवढ्या वेळपासून मी तुझ्या प्रश्नाचेच उत्तर देत होतो. पण कदाचित तुला कळाले नाही. आता मी तुला सविस्तर सांगतो.
– संत म्हणाले – प्रत्येक मनुष्यामध्ये एक आग असते. जर तुम्ही त्यामध्ये काम, क्रोध, मोह आणि मत्सराचे लाकडं टाकाल तोपर्यंत तुम्हाला कधीच शांती मिळू शकणार नाही. जोपर्यंत तुम्ही अशांती पसरवणा-या या तत्त्वांना आगीत टाकणे बंद करणार नाही तोपर्यंत तुमचे मन शांत होणार नाही. संतांचे बोलणे ऐकून शेठजींना त्यांच्या समस्येचे समाधान मिळाले होते.

लाइफ मॅनेजमेंट
प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात शांतता हवी असते. पण यासाठी त्यांना काहीच करायचे नसते. जीवनात शांततेसाठी मनाला नियंत्रणात ठेवणे गरजेचे असते. जर तुमच्या मनात काम, क्रोध आणि मोहासारखी भावना असेल तर तुम्हाला कधीच शांती मिळणार नाही. मनात समाधानाचा भाव असल्यावर जीवनात शांती मिळणे शक्य आहे.