लव्ह ऍट फर्स्ट साईट…..

Spread the word

तो आमच्या ऑफिस मधलाच. त्याला पाहिल कि धडधडायच. त्यात हि तो आपला बॉसच असेल तर झालच मग.
माझं रिपोर्टींग त्याला होत, खरतर मी न्यू जॉईन होते, त्यामुळे माझे जास्त काही फ्रेंड नव्हते, कामाचा अनुभव हि नाही, पहिलाच जॉब, त्यामुळे सगळ कस उत्साह, जाबादरीची जाणीव अगदी नव नवं वाटायच.
त्याने म्हणजे माझ्या बॉस ने कामाची पद्धत,नक्की कस काम आहे सगळं समजून सांगीतलेल.आता त्याला “तो” म्हणण्याच कारण अस कि तो बॉस होता पण वयाने माझ्या पेक्षा थोडाच मोठा असेल म्हणून, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ‘तु’ मधे जो आपलेपणा असतो, हक्क असतो ते ‘तुम्ही’ त कधीच नसतो,आणि अजूनही आहेत कारण कळेल तुम्हाला हळु हळु…
तर…तो सगळी काम अगदी व्यवस्थित समजावून सांगतच होता पण…..माझं कामाकडे कमी, त्याच्याकडेच जास्त लक्ष जायच, कारण तो होताच तसा, म्हणजे हँडसम च्या बाबतीत तो अगदी टॉपलाच होता, त्यात काही विषयच नव्हता, पण त्याचा स्वभाव, म्हणजे कधीच कधीच मी त्याला कुणावर चिडताना, टेंशन मध्ये पहिलाच नाही, माझ्याकडूनही हि चुका झाल्यात तश्या, म्हनजे माझ्या हातात ना कोणतीच गोष्ट अशी कॉन्स्टंट राहत नाही, ती पडते आपोआप, मी काहीच करत नाही तरीही, आणि मग मी धडपडते….असो, पण तरीही म्हणजे कधीच चिडला नाही तो. म्हणजे कुणावरच नाही कधीच. पण सतत कस कोण अस निर्विकार राहू शकत? सुरवातीला मला वाटायचं कुछ तो गडबड हे दया ! पता लगाना पडेगा !! हम्म्म….
आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपण एका मोठया पोस्टवर आहे तो एक इगो, हे दूर दूर नव्हता त्याच्याकडे, म्हणजे ज्या पद्धतीत तो आमच्याशी, बोलायचा तसाच तो अगदी साफसफाई ला येणाऱ्या काकांसोबत हि वागायचा, आपुलकीने सगळ्यांना विचारायचा, कामाच्या कोणत्याही बाबतीत आमची मत हि विचारायचा, आणि त्याला महत्व हि द्यायचा, राहायला अगदी साधारण म्हणजे उंच, गोरा, फॉर्मल वेश, सगळं अगदी साधं साधं कधी कुठला दिखावा नाही, कि कुणाला कमीपणा नाही, एका सभ्य पुरुषाची सगळी लक्षण त्याच्यात होती, अन लास्ट बट नॉट द लिस्ट त्याची स्माईल म्हणजे अगदी कातिलच. इतका डाऊन टु अर्थ म्हणजे देवाने अगदी वेळ घेऊन बनवलेला असावा असा अगदी !! माझ तर ते लव्ह ऍट फर्स्ट साईट,अस काहीस झालेलं बहुदा.. त्याच्यावर. मग मी माझी शेरलॉक होम्स, सीयडी अशी गॅंग गोळा करून सगळा तपास सुरू केला, सगळ्या सोशल मीडिया वर शोधून झालं ना पण कुठेच… अगदी ईत्तुसा पण नाही सापडला तो.एकवेळ बाप्पा च अकाऊंट सापडेल सोशल मीडिया वरती, पण याच नाही..मग..माझ्यामधला एसीपी प्रदधुमन परत जागा झाला, कुछ तो गडबड हे दया !! मग ऑफिस मधे हळू हळू तपास सुरु ठेवला, सगळी हेरगिरी झाल्यावर काही खात्रीदार सूत्रांकडून समजल, महाशयांचा या सगळ्या विलोभना, मोहमया पासून दूर दूर पर्यंत संबध नाही, कुठेच अकाऊंट नाही त्याच.. मला तर जवळ जवळ धक्काच बसला ऐकून.. आजच्या सोशल जगात अस असत का कुणी, आता माणसाने शोधायचं तर कस शोधायच सांगा??  माझा तर पूर्ण मुडच गेला, काय करणार आता??
मला माहिती नव्हत, पण हळू हळू कळत गेलं, कि मी एकटीच नाही बर लाईन मधे, ऑफिस मधे खुप साऱ्या जणी आहेत… म्हणजे आमची एखादी संघटना होईल एवढ्या. मग मीच माघार घेतली, आता नसते एखाद्याला आवड तर काय करणार ना !! मी आपलं त्याच्यावरच फोकस करायचं ठरवलं….
पण…..असच ना तो एकदा नवीन प्रोजेक्ट विषयी सांगत होता खूप सिरीयस होऊन, म्हणजे त्याला तो लूक सेट नाही होत पण सांगणार कोण त्याला, जाऊदे… मला नोट्स काढायला सांगितल्या होत्या, तो बोलत होता, पण मला ऐकू येत नव्हतं काही, त्याच लक्ष लॅपटॉप मधे अन माझ त्याच्याकडे. आणि झाला ना डोळ्यांचा अक्सीडेंट ! मी त्याच्याकडे पाहतेय हे बहुदा त्याच्या लक्षात आलं, त्याने डोळे मोठे करून, जवळ जवळ डोळे वटारूनच पाहिल माझ्याकडे. तेव्हा मात्र मी स्वप्नांच्या अवकाशातून जमिनीवर आदळले, आणि माझा गोंधळ उडाला, त्यात मी नोट्स उलट्या पकडल्या होत्या, झाला का पोपट, हे सगळं त्याच्या लक्षात आलं असावं, मला वाटलं तो रागवेल पण तोही आतल्या आत हसायला लागला होता बहुतेक, काहीच बोलला नाहि, मला कळत नव्हतं नक्की काय कराव??
सर मी आलेच जरा, अस मी विचारलं गोंधळतच, त्याने हि मानेनेच होकार भरला, आणि मी क्षणाचा हि विलंब न लावता केबिन बाहेर सुपरमॅन सारखी. कधीचा श्वास अडकला होता अस मला झालं. मी डेस्क वर येऊन बसले, हृदय अजूनही धडधडत होत. डोळे मिटले, नक्की काय झालं, मलाच कळत नव्हतं. डोळे मिटले तर समोर परत तोच, अन त्याला आठवलं कि आपोआप चेहऱ्यावर स्माईल. पण आज त्याला कळल असेल ना मी पाहत होते ते?? शी काय वाटलं असेल त्याला?
काय विचार करेल माझ्या विषयी??
कशी आहे ही?? काय चाललय हिच?? मीच माझी उजळणी घेत होते. गिल्ट आल होतं मला. आता त्याच्या समोर जाताना कसा रिऍक्ट करेल तो?? बाप्पा काय करू आता??
माझा नुसता गोंधळ उडाला होता, मी त्याला टाळायचं ठरवलं, पण किती वेळ!! शेवटी तो बॉस आहे. मी तशीच बसून राहिले डेस्क वरती. थोड्या वेळाने त्याच्या केबिन ओपन झाल्याचा आवाज आला, मी परत धडपडले, माझा श्वास थांबतो कि काय वाटलं मला. त्यात माझा डेस्क त्याच्या केबिन समोर, एरवी याचच भारी वाटायचं मला, पण आज नको झालं होतं. मी कामात बुडाल्याच भासवत होते, पण नजर केबिन कडे होती, शेवटी आलाच तो बाहेर, त्याची पावलं माझ्या कडे येतायत अस वाटलं मला. मी खाली मान घातली, लक्ष नसल्या सारखं दाखवलं, तो माझ्या डेस्क शेजारून गेला एकदाचा, परत एकदाचा सुटकेचा निश्वास टाकला मी.
तशी मी फार धीट आहे, पण त्याच्यासमोर काहीच नाही ना जमत मला… तरीही मी मलाच धीर देत होते, काय झालय एवढ, काहीच तर नाही ना… एक मोठा श्वास घेतला, अन शांत झाले तात्पुरती तरी..
पण हे गिल्ट असत ना सारखं टोचत, दुसरा दिवस उजाडला, आज मी काही ठरवून आलेले घरून, त्याच्याकडे पहायचं नाही, कामावर लक्ष द्यायचं फक्त..
पण त्याने परत आत बोलवल, मी सगळा धीर एकवटून गेले, परत तेच काम नोट्स काढायच्या, पण आज माझं ठरल होत, शांत राहायचं त्याच्याकडे नाही तर लॅपटॉप कडे पहायचं.. अन तसच केलं, कश्या तरी नोट्स काढल्या आणि आले बाहेर, पण त्याला काय झालं काय माहित, परत पाच मिनिटाने त्याने बोलवल, मी गेले डायरी घेऊन..
मला वाटलं काही नोट्स राहिल्यात वाटत..
मी विचारलं हि त्याला कि काही राहिलेत पॉईंट्स???
त्याने मला बसायला सांगितल, मला पाणी हव का विचारल??
मी मानेनेच नकार दिला, पण माझा आयकॉन्टॅक्ट होत नव्हता आज.
त्याने चक्क मला विचारलं, काय झालं??
मी स्माईल देत, निथिंग सर अस बोलले.
पण माझ काहीतरी बिनसलय हे लक्षात आलेल त्याच्या. कारण आत्ता पर्यंत कितीदा मी बडबड करून, आणि धडपडून झालं असत, पण आज मी जेवढयास तेवढं बोलत होते..
त्याने सरळ मुद्याच पकडला ना, काल जे झालं त्याच काही टेंशन आलंय का??
आता झाली का पंचाईत, हो म्हणावं कि नाही???
त्याला आता पक्क समजल होत, कि मी नर्व्हस झालेय, त्याने पाण्याचा ग्लास समोर ठेवला आणि मला सांगू लागला,
काल जे झालं ते नॉर्मल आहे,अस होत बरेचदा आपल्या सोबत, त्यात अस एवढ गिल्ट येण्यासारखं काहीच नाहीये, आणि मला काय वाटलं असेल वैगेरे तर मला काही वाटलं नाहीये, माझ काही वाईट मत झालं नाहीये तुझ्याबद्दल, आणि खरं सांगू माझ्यासाठी हे नवीन नाहीये आता !! अन तो परत हसू लागला. तस मला अजूनच वाईट वाटायला लागलं, पण मला ऐकायचं होत, काय म्हणतोय तो यावर…. तो बोलू लागला परत…
खर सांगतो, म्हणजे एक बॉस म्हणून नाही तर एक मित्र म्हणून समज… कि आपण आजकालची पिढी आहोत, आपल्याला अस कुणी आवडणं हे नॉर्मल आहे, बस फक्त…. समोरच्या कडून हि ती अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे. आपल्याला रोज किती वैक्ती भेटतात त्यात हि किती आवडत, पण प्रत्येक आवडी मागे काही वेगवेगळी कारण असतात. आता आपल्याला कोणत्या कारणाने ती वैक्ती आवडते हे महत्त्वाच, कारण त्यावरच आपलं आवडणं कोणत्या स्थितीत आहे हे सिद्ध होत.. सो तुम्हाला जो कुणी आवडत असेल त्यावर बिनधास्त प्रेम करावं ,फक्त कोणत्या रीटर्न अपेक्षा ठेवू नका…ओके, मला वाटत मी जास्त फिलॉसॉफीकल बोलायला लागलोय, सो आपण थांबूया इथेच, ओके.. सो डोन्ट वरी, काही मोठं झालं नाहीये. बी नॉर्मल आणि बॅक टू वर्क ! आपल्याला खूप काम करायची आहेत, काय???  नाऊ स्माईल प्लिज…
त्याच बोलण कॅम्लिट झालेलं, म्हनजे प्रश्न हि त्यानेच निर्माण केले, आणि उत्तर हि त्यानेच दिली, ती ही अशी सहज… म्हणूनच तो आपलासा वाटायचा मला, म्हणजे न बोलता ज्याला आपलं दुःख कळत तो खरा आपला जिवलग असा होता तो… माझ्या डोळ्यात दोनचार अश्रू आले होते तेव्हा पण ते गेले माघारी न बरसातच. म्हणजे अश्या सिचवेशन मधे सुद्धा तो इतका शांत राहून, समजुतदार पणे सगळ हँडल करत होता, म्हणजे कुणाला कस समजवायच हे त्याला करेक्ट जमत होत, माझ्या पडलेल्या चेहऱ्यामागचं बर्डन, गिल्ट उतरलं एकदाच.. अन मी शांत मनाने केबिन बाहेर पडले, खरतर नंतर आमच्यात बऱ्याच वेळा बोलण झाल, काम सोडून इतर विषयावर पण त्यात कुठेही बॉस कॅलिग्ज अस नातं नव्हतं तर एक छान फ्रेंड्स बनलो होतो आम्ही… कारण एक कम्फर्टनेस आला होता आमच्या मैत्रीत.. आमचं पुढे काही झालं नाही हे खरं, पण मी दुःखी हि नाही त्यासाठी, कारण त्या एका नात्याच्या अट्टाहासा मधे, कदाचित मी एक माझा बेस्ट बडी# समजुतदार मित्र# माझी बडबड एकूण घेणारा बिचारा#  हे सगळ मिस केलं असत… सो
तो बॉस ते माझा चांगला मित्र हा टप्पा आम्ही पार केला एकदाचा. आणि मी म्हणजे मी मागे लागून ह त्याला सोशल जगात ऍक्टिव्ह केलं बर… त्याबद्दल अजून त्याच्याकडून पार्टी बाकी आहे, पण घेऊ कि ती ही लवकरच काय???

ता.क. हि एक काल्पनिक कथा आहे, याचा कसलाच कुनाशी संबध नाही, आणि जर तस भासल्यास तुम्ही.… ते आपलं आपलं बघून घ्या,आम्हाला काय करायचय !

बस बाकी सगळ निवांत!!

निलम घाडगे.