लघुकथा-मीरा..राधिका

Spread the word

मीराच लग्न होतं आज…छान नटली होती…नाकीडोळी सुंदर होती ती…सावळी असली तरी एक वेगळंच तेज होतं तिच्या चेहऱ्यावर…राधिका आणि अवनीश खूप खुश होते…मीराला मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून…
मीरा..राधिका आणि अवनीशची मुलगी…त्यांचे संपूर्ण विश्व् तिच्यात सामावले होते…खूप जीव होता दोघांचा तिच्यावर…तिने काही मागितले आणि तिला मिळाले नाही,असं कधीच झाले नाही..पण म्हणून अतिलाडाने मीरा बिघडली नाही…उलट तिला जाणीव होती…तिचे आई बाबा तिच्यासाठी काय काय करतात…
तर अशी ही मीरा…ती जसं जसं मोठी होऊ लागली तसं राधिकाला एक अनामिक भिती वाटू लागली…ते सत्य जर मीराला कळलं तर..ती कशी react होईल..याबाबत ती नेहमी साशंक असे..सतत विचार करत असे..तिला वाटे मीराला बाहेरून समजण्यापेक्षा आपणच लवकर सांगायला हवं…अवनीश तिला समजावी…आपली मीरा समजूतदार आहे..योग्य वेळ येताच आपण तिला सारं काही सांगू..
मीराला डॉक्टर बनायचे होते…ती मुळातच हुशार होती..म्हणून दोघांनी तिला पूर्ण support केला…मेडिकलला असताना मीराची समीरशी ओळख झाली..ओळख मैत्रीत..आणि मैत्री प्रेमात कधी रुपांतरीत झाली…हे दोघानांही कळलं नाही…पण आपले ध्येय पूर्ण झाल्याशिवाय पुढे जायचे नाही असे दोघानी ठरवले होते…
काही वर्षांनी दोघांचे शिक्षण पूर्ण झाले…आता घरी सांगायची वेळ आली होती…समीर घरी आला..तसा तो परिचयाचा होता…पण जावयाच्या रूपात हा भेटेल असं त्यांना वाटलं नव्हतं…पुढे जाण्याआधी राधिकाने समीरला सत्य सांगण्याचा निर्णय घेतला…त्याला अंधारात ठेवून काही निर्णय घ्यायचे नव्हते…तिने सर्व समीरला सांगितलं…थोडया वेळ तर त्याला विश्वास बसेना..पण त्याने accept केलं ani आपल्या आई बाबांनाही सांगेन…राधिका आणि अवनीश खूप खुश झाले….पण आता मीराला सत्य सांगणं भाग आहे..
राधिका सतत कसला तरी विचार करत असते, ही गोष्ट मीराच्या ध्यानात आली होती..न राहवून तिनेच एकदा विषय काढला..राधिकाच्या अस्वस्थतेच कारण मीरालाही जाणून घ्यायचं होतं…आणि राधिकाने तिला सर्व सत्य सांगितलं.मीरा स्तब्द होऊन सारं काही ऐकत होती…हे कस शक्य आहे…ती जे काही ऐकत होती त्यावर तिचा विश्वास बसत नव्हता…पण हे स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता…समीरलाही हे माहित आहे आणि त्याने तरीही तिला स्वीकारलं,हे ही तिला कळले.इतकं प्रेम करणारी माणसं माझ्या आयुष्यात आहेत,या जाणिवेने मीरा सुखावली…
सारं काही व्यवस्थित झालं…मीरा आणि समीरच लग्नही…
आज राधिका त्याचं मंदिरात उभी होती जिथे ती 26 वर्षांपूर्वी आली..लग्नाला 6 वर्ष होऊनही तिची कूस उजवली नव्हती..आपल्या आराध्य दैवताकडे मागणं मागायला आली होती…तेव्हा मंदिराच्या पायरीवर 5-6महिन्याची तापाने फणफणलेली मुलगी तिला सापडली…तिच्यावर योग्य वेळी तिने उपचार केले…म्हणूनच आज ती जिवंत होती…ती मीरा होती…राधिकाने तेव्हा तिला जीवनदान दिले होते आणि आज तिचे कन्यादान करून अजून एक पुण्य पदरात पाडून घेतलं…

स्नेहा ननावरे काळे