रेषेपलीकडचे जग

Spread the word

आज तिला आईला पाळी आलीय ती नाही येऊ शकत सावंकार …

हे शब्द कानावर पडले खरे , पण सावकाराच्या अंगात आलेला चेव चढला होता ,ज्याला मस्ती म्हंटलं तरी चालेल ….

कित्येक वर्षांपूर्वी नवऱ्याने घेतलेल्या पैशाची व्याजासकट तो वसुली करत होता ,पैशाने नव्हे तर शरीराचे लचके तोडून…
.
.
आता चाळीस हजारांचे लाख रुपडं झाल्यात आणि हिला मस्ती आल्या व्हय , झोपायचं खाली गप उताणे खाली झोपायचं …
.
.नायतर मुकाट्यानं वायदी द्यायची …
.
.
सावकार नुसता शिव्या गाळ करायचा …!

सुनंदा तशी लहान होती वयाने ,दिवसे दिवस वाढणारे तीच शरीर आईची चिंता वाढवीत होती ,तुटपुंज्या कपड्यात पोरींचे शरीर झाकून ठेवायचं आता तिला ठेवनं आता अवघड झालं होत …

एक दिवशी सावकार घरी आला होता ,आज्जी बाहेर गेली होती ,घराची कुंडी लावून कुडाच्या भिंती असलेल्या घरात, सुनंदाची आई झोपली होती ,स्वतःच्या आईला उपभोगाताना तिने सावकाराला बघितले होते , बाप कर्जात बुडून मेला आणि मागे सोडून गेला एक पोरगी ,एक तरणी बायको आणि एक म्हातारी …

कुडाच्या भिंतीच्या घरात आईवर होत असलेला बलात्कार तिने डोळ्याने बघितला होता , नुसता बघितला नव्हता तर आता त्याची झळ तिच्या वाढत्या शरीराला नजरेने लागत होती .

आईला दम्याचा त्रास , एक दिवशी मळ्यातून बोंब उठली की तिने विहिरीत उडी घेतली आहे , जगण्याच्या त्रासाला कंटाळून मरण जवळ केलं अस समद्या गावात झालं होतं , पण ती जगण्याला कंटाळली नव्हती ,ज्या दिवशी सावकाराची नजर पोरीवर गेली होती त्याच दिवशी तिची जगण्याची इच्छा गेली होती आता पोरीला वाचवायचं कसं ह्या चिंतनेच मरणाला जवळ केलं असेल तिने , पण शरीरावर असलेले चावलेलं व्रण काही वेगळंच सांगत होते ….

ती आत्महत्या नव्हती ,तो खून होता …
पोरीच्या अंगावर टाकलेला सावकाराने हात आणि त्याला जाब विचारायला गेलेल्या मळ्यात तिचाच मृत्यु घडला होता …

सावकाराने बाई भोगली पण आता पोरीला पण सोडली नाही एकदा दोनदा तिला देखील मळ्यात कामाला म्हणून नेऊन भोगली…

त्या कवळ्या पाकळ्या त्याने कुस्करून टाकल्या होत्या , आता सुनंदा चे शरीर वाढू लागलं होत आणि हे सगळं आता सहन करण्या पलीकडे झाले होते ,सगळं सोडून आता त्यांनी मुंबईची वाट धरली होती …
.
.
पहाटे साडे चार वाजता दादर स्टेशन ला पोचली ,आपलं गाठोडं आणि त्या लुगड्यात बांधलेली कपडे ,एक प्लास्टिकची पिशवी आणि सोबत असलेली गरिबी घेऊन मुंबई सारख्या स्वप्नांच्या दुनियेत पहिलं पाऊल ठेवलं होत त्यांनी , रेल्वे चे पैसे देखील नसताना विदाऊट तिकीट प्रवास करून सुंनंदा आज्जीला घेऊन मुंबईत आली होती .
.
.
भिर्भिर्लेली नजर लोक मुंबईत चटकन ओळखतात ,काम देतो आणि राहायला जागा पण देतो म्हणून त्यांना दादरच्या स्टेशन बाहेरच्या दलाल लोकांनीच पहिली वस्ती दाखवली ती कामठीपुरा , पहाटेच्या पहिल्या अजाण सोबत त्यांनी त्या वस्तीत प्रवेश केला ,कोंदट अश्या वातावरणात त्यांना काहीच जाणवत नव्हते ,
आता झोपा तुम्ही सकाळी निवांत येतो म्हणून तो माणूस सोडून देखील गेला ….जो की परत कधी आला नाही….

डोळे उघडले तेव्हा ,समोर एक 55 ते 60 वर्षातील बाई होती ,अगदी तोंडात पान चगळत समोर बसली होती ,चहा नाश्ता दिला ,कुठून कसे आला सगळं विचारले ,आणि तुम्हाला सोडून जाणारा जाताना पैसे घेऊन गेलाय हे पण सांगितलं …
तिचा पहिला संवाद असा होता …
ये देख लडकी ,यहा धंदा होता है पेट के लिये ,लोगो का बिस्तर गरम किया तभिच तेरा खिसा गरम होवेगा , यहा कोई भगवान नहीं जो फोकट मैं तुझे पालेगा ,अभी एक हफ्ता सब काम सिख ले , हफ्ते के बाद ‘तेरी नथ उत्तराऊंगी …

हे जस च्या तसे त्या पोरीच्या तोंडून ऐकुन आलो होतो मी तिथून सुनंदा चा प्रवास चालू झाला तो चालूच झाला .समाजाने एक वेगळं वळण प्रत्येकाच्या आयुष्याला दिलेलं असते , काही लोकांना खूप जवळून बघत असतो मी वाचत असतो त्यांच्यावर लिहत देखील असतो मागे माझा एक ब्लॉग तिला कोणीतरी दाखवला हे बघ ह्याने असं लिहलं आहे तेव्हा फोन करून बोलली होती ,मिलने का दादाको एक दिन …
मागच्या आठवड्यात भेटली नऊ वर्षाचं मनात साठलेलं सगळं दुखणं बोलून व्यक्त झाली ,
गावाकडं व्याज म्हणून आईचं शरीर लुटलं डोळ्या समोर
पण पैसा फिटला नाही ,आज शरीर आहे म्हणून पैसा आहे , आज्जीला एका आश्रमात ठेवलं आहे ,तिला पैसा दिला जातोय ,गाव सुटलं गावात धंदे वाली म्हणून लोकं नाव ठेवतात पण सायब पोटासाठी सगळं विकावं लागतंय ..

मी सहज विचारले काय रे ,येणार का ह्यातुंन बाहेर …

सुनंदा हसत म्हणाली …
नको सायब , इथं लोक इनामदार भेटत्यात , लचके तोडतात पण पैसा पण देत्यात ,इथं चक्रवाड व्याज घेत नाही कोण सावकार येऊन , इथं फक्त वासना घेऊन येतात झोपतात आणि निघून जातात ,इथं कोण कोणाचं नातेवाईक नाहीत कोण कोणाचे मित्र नाही इथं आहे तो फक्त व्यवहार एका शरीराचा दुसऱ्या शरीरासोबत .
तुम्हाला भेटायची इच्छा मनात खूप होती ,आमच्या सारख्याना अगोदर तुम्ही भेटला असता तर आज मी देखील वेगळ्या दुनियेत असते ,तुमच्या भाषेत रेषेच्या पलीकडे असते …

जड पावलांनी मी बॅग हातात घेतली ,हातात अस्वस्थ नायक पुस्तक होतं ,एकदा त्यावर नजर गेली आणि माझ्यातल्या अस्वस्थ नायकाला म्हंटलं की बघ हे खरं जगणं आहे लोकांचं जे आपण जवळून बघतोय बाकी तर सगळं दुनिया डोंग करतेय की मी खुशीत आहे .इथं दुःखच दुःखाला पीत असतंय ..काहींची सुरुवात आणि शेवट जन्म आणि मृत्य यांची नोंद शासन दरबारी नसते हे मला पटलं ..

काहींच्या साठी आपण काहीच करू शकत नाही पण अश्या वाटेवर जाऊ नये यासाठी प्रयत्न नक्की करू शकतो जो प्रत्येकानं केला पाहिजे .

भेटू परत अश्याच एका सुनंदाला जगणं जाणून घ्यायला …

सुहास दाभाडे
Suhas Rukmini Dabhade
रेषे पलीकडे असणारं जग
अस्वस्थ मन
( टीप सदर व्यक्तिची नावे आणि अन्य माहिती गुप्तता ठेवली आहे.नाव दिल्यावर नको तिथं अक्कल पाजळू नये )

फोटो गुगल साभार