रताळ्याची पोळी – “बटाट्या पेक्षा जास्त पोष्टिक”

Spread the word

सध्या बाजारात आपल्याला रताळे बघायला मिळत आहेत. रताळे हे बटाट्या सारखेच जमिनीखाली येते हे तुम्हाला माहीतच असेल. तुम्ही कदाचित याकडे फक्त उपवासा मध्ये खाण्याचा एक पदार्थ म्हणून पाहत असाल पण हे तुम्हाला सांगू इच्छिते की रताळे हे बटाट्या पेक्षा जास्त पोष्टिक असते. यामध्ये 16 टक्के स्टार्च आणि 4 टक्के शर्करा असते. रताळ्यामध्ये विटामिन ‘ए’, कैल्शियम, फॉस्फोरस, सोडियम, पोटाशियम, लोह आणि अल्प प्रमाणात विटामिन ‘सी’ असते. रताळ्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, कैल्शियम, विटामिन ‘ए’ जास्त असते. मग खाणार ना आता रताळे. रताळ्याची छानशी पोळीची रेसिपी पाहूया.

रताळ्याची पोळी

साहित्य:
• रताळी
• कणीक
• गुळ
• वेलदोडे
• मीठ
• दोन तीन चमचे तेल
• तांदळाची पिठी

कृती:
• रताळी शिजवून, सोलून वाटून घ्यावी.
• एक वाटी रत्याळाचा गोळा घेतल्यास एक वाटी गुळ घ्यावा. दोन्ही एकत्र करून चांगले शिजवून घ्यावे.
• चवीला वेलदोड्यांची पूड घालावी. एक वाटी कणीक घेऊन सैलसर भिजवून घ्यावी.
• कणकेचा छोटा उंडा घेऊन, लाटून, वाटीचा आकार करुन रताळ्याचे सारण त्यात भरावे व पोळी लाटावी.
• गरम असतांनाच साजूक तूप लावून ठेवावी.

धन्यवाद