होळी, रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा (काय काळजी घ्यावी ?)

Spread the word

होळी, रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा
(काय काळजी घ्यावी ?)

सर्वांचा आवडता होळी, रंगपंचमी सण लहान मुले तर या सणाला काही दिवस आधीपासूनच खेळायला लागतात. हा सण आहेच एवढा मजेशीर, होळी, रंगपंचमी न खेळता कोणी राहू शकत नाही अगदी लहानांपासून ते वयस्कर मंडळींपर्यंत.

होळी खेळताना जेवढा आनंद आहे तसेच काही अडचणी आहेत यावर आपण थोडं लक्ष देऊ या जेणेकरून तुम्ही मनसोक्त होळी रंगपंचमी चा आनंद लुटू शकता. रंगाचे डाग आणि रंग घालवण्याचे उपाय खाली दिले आहेत तसेच रंग खेळायला जाण्यापूर्वी काय काळजी घ्यायची त्याच्या टिप्स नक्की वाचा.

होळी, रंगपंचमी म्हणजे रंगाचा खेळ आणि रंग आहे तर होळी आहे होळी खेळण्याचे विविध प्रकार आहे कोणी सुक्या रंगाची होळी खेळतात तर कोणी पाण्याचा वापर करून खेळतात काहीजण नैसर्गिक रंगाचा वापर करतात ज्याचा शरीरावर काही परिणाम होत नाही,पण काहीजण रासायनिक आणि केमिकलचा वापर करून रंग खेळतात जे शरीरासाठी खूप अपायकारक असतात.

होळी खेळण्याआधी चेहऱ्यावर मॉइश्चरायझर किंवा तेल लावावे.
केसांमधून रंग काढण्यासाठी सिरका किंवा आवळाने केस धुवावेत.
बेसन आणि लिंबू या नैसर्गिक पद्धतीने रंग काढू शकतो.
होळी खेळताना जास्त काळ रंग त्वचेवर राहू देऊ नका मध्ये मध्ये त्वचेवरचे रंग काढत रहावे त्यामुळे तुमची त्वचा खराब होणार नाही.

होळीचे रंगांमुळे हानिकारक त्वचारोग होतात यापासून सावध रहा.
होळी खेळताना रंगांपासून केसांना वाचवणे अशक्य नसते. परंतु यामध्ये चिंता करण्याचे कारण नाही तुम्ही केसांना लागलेले रंग वेळोवेळी केस झटकल्याने यापासून बचाव होईल नंतर कापूस किंवा मऊ कपड्याने हळूहळू केसातील रंग काढा.

त्वचेवरील रंग काढण्यासाठी दही चा वापर करावा ज्या ज्या ठिकाणी तुमच्या त्वचेवर रंग लागला असेल त्याठिकाणी दहिने मसाज करावा हळूहळू रंग हलका पडत जाईल पण लक्षात ठेवा हलक्या हाताने हा मसाज करायचा आहे. चिवट रंगांचे डाग बेसन आणि लिंबू च्या वापराने जाऊ शकते यासाठी बेसन आणि लिंबू च्या रसाचा लेप बनवावा, यामध्ये दही चा पण वापर करू शकता, या लेप ला रंग लागलेल्या त्वचेवर लावावे आणि हलक्या हाताने रंग काढावा.

होळीच्या रंगाने तुमचे केस खराब होऊ नये असे वाटत असेल तर रात्री आवळा भिजवलेल्या पाण्याने केस धुवावेत पण याआधी रात्री केसांना तेल लावून चांगले मसाज केले पाहिजे आणि होळी खेळल्यानंतर रंग काढण्यासाठी शाम्पू ने केस धुऊन त्यानंतर आवळ्याच्या पाण्यामध्ये सिरका मिळवून केस धुवावेत. तुमचे केस पहिल्यासारखे चमकदार होतील.

त्वचेवरचा रंग निघाले नसेल आणि रंगामुळे आग होत असेल तर साबण चा उपयोग करू नये तर पीठाने त्वचा चांगल्या पद्धतीने साप करावे आणि यानंतर पाण्याने धुऊन मॉइश्चरायझर लावावे याने तुमची त्वचा मुलायम होईल आणि आग होणे बंद होईल

होळीचा रंग काढण्यासाठी हानिकारक गोष्टींचा वापर टाळावा आणि जर रंगांमुळे कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.

धन्यवाद.