मोरपिसाचे उपयोग

मोरपिसाचे उपयोग :- _मोरपीस घरात असल्याने अनेक फायदे होतात ते पुढीलप्रमाणे._

१. कालसर्प : ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे, अशा व्यक्तीने ७ मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवावेत. ७ व्या दिवशी ते मोरपंख उशीतून काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत. त्यासोबत अजून ११ मोरपंख वाढवावेत. कालसर्पाचं प्रभाव कमी होईल.

२. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष : प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेन तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत.

३. वैवाहिक जीवन : पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूम मध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर १ मोरपिस लावावा.

४. राहूची महादशा : ज्यांच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. प्रभाव कमी होण्यास मदत होईल.

५. हट्टी व तापट मुले : मुले खोडकर आणि जिद्दी असतील तर मोरपंख माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हात पंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलाला घालावी. तापट व हट्टी मुले शांत होतींन.

६. स्वयंपाक घरातील वास्तुदोष : स्वयंपाक घरातील नैऋत्य कोपऱ्यात,लाल धाग्यात,सफेद कवडीसोबत २ मोरपीस बांधावेत.

७. शत्रू मित्र बनण्यासाठी : पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव, रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपीस पाण्यात प्रवाहित करावे.

८. लहान मुले रात्री घाबरणे : चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही.

९. प्रगतीसाठी : घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपिस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल.

१०. देवघर : आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पूजावे.

११. सुखमय जीवन : वृंदावनात घराघरात सुख-समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात ६ मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन, चिंता दूर होईल.

असा हा छोटासा मोरपंख अनेकदृष्ट्या उपयुक्त असून,यामुळे सुख,शांती व समृद्धी वृद्धिंगत करणारा आहे.