मैत्रीची परतफेड
बऱ्याच दिवसांनी सुशांत गावी आला होता , एकदम सूटबूट मध्ये, शहरात राहून बरीच प्रगती केली होती त्याने. बराच काही विसरला होता तो पण आपल्या एका बालमित्राला मात्र विसरला नाही, संध्याकाळी फिरत फिरत तो परागच्या घरी गेला, पराग सुशांतच्या बालपणाचा मित्र, त्याने बरीच मदत केली होती एकेकाळी सुशांतला. दोघांनी गळाभेट केली , सुशांतने एक मोठी बॉक्स आपल्या गाडीतून काढली ज्यामध्ये बरीच महागडी वस्तू भेट म्हणून होती , ती त्याने परागला देऊ केली, पराग थोडा विचारात पडला आणि त्याने तो बॉक्स एका टेबलावर ठेवत बोलला , चल जरा फिरून येऊ !!!
दोघेही बाहेर गेले , थोड्या अंतरावर एक पाणीपुरीच्या स्टॉलवर थांबले , मनसोक्त ताव मारला , नंतर लहानपणीच्या श्यामकाकांच्या टपरीवरचे गरम गरम मसाले चहा सूर्रर्रर्रर्र करून पिऊन गेले, त्यांच्या लहानपणाच्या शाळेजवळील कट्ट्यावर बसून बरेच गप्पा मारले, तीन चार तास कसे निघून गेले कळलेच नाही. पण सुशांतचे भन्नाट गप्पा काही संपत नव्हते , खूप दिवसांनी तो खुलला होता असा !!! पराग मात्र प्रत्येक ठिकाणी एक सेल्फी घेत होता !! रात्र झाली , दोघे घरी परतले…. परतल्यावर परागने तो मोठा बॉक्स सुशांतला परत केला, म्हणाला मला माझी भेट मिळाली, सुशांत अचंबात पडला ….
पराग पुढे बोलला , चकित होऊ नकोस , कधी एकेकाळी केलेल्या मदतीची परतफेड तू वस्तूत मोजली , पण तू विसरलास कि मी माझे सगळ्यात मौल्यवान गोष्ट तुला दिली होती ज्याची परतफेड करणे तुला मागील बरेच वर्ष शक्य नाही झाले ….. ते आहे ” माझा वेळ ” जो मी तुला दिला …. आज मागील तीन चार तासापासून मी त्याची वसुली करत होतो , फोनमधले बरेच फोटो दाखवत तो बोलला …माझी वसुली झाली !! मैत्रीची परतफेड वस्तू मध्ये नाही तर वेळेमध्ये द्यावी !!
सुशांत काहीच बोलला नाही !! एका गरीब गावातल्या मित्राने त्याला त्याची गरिबी दाखवून दिली होती … तो हसला आणि पुन्हा भेटतो म्हणून निघून गेला
प्रभाकर जक्कन