“मेथीदाण्या चे लोणचे”

Spread the word

 

आपण बऱ्याच प्रकारची लोणचं करत असतो जस की कैरीचं लोणचं, लिंबू लोणचं, आवळा लोणचं वैगरे पण आज आपण वेगळ्या प्रकच लोणचं बघणार आहोत हे शरीरासाठी पोषक आहे
“मेथीदाण्या चे लोणचे”
हे लोणचं हिवाळ्याची अतिशय उत्तम आहे

हे मेथीदाण्या चे लोणचे अजिबात कडु होत नाही.
अगदी साधं, सोपं, आणि अतिशय चविष्ट, आरोग्यदायी वगरे वगरे ..

पहिले ही तयारी करून ठेवा.

1 वाटी मेथी दाणे घ्या..
त्या मेथी दाण्याला 3 तास पाण्यात भिजवत ठेवा..

3 तासा नंतर त्याला थोडं 10 ते 15 मिनिट सुखवून मेथीदाण्या ला एका सुती कापडात त्याची पुरचुंडी बांधून एका बंद डब्यात ठेवा 8 तास …

जेव्हा मेथीदाण्या ला मोड (कोंब) आलेले दिसतील तेव्हा ते लोणच्या साठी तयार …

हे लोणचे दोन प्रकारे करता येत…

साहित्य :

1 वाटी मेथीदाणे (मोड आलेले)
1 वाटी गूळ (बारीक केलेला) किव्हा गूळ आपल्या अंदाजाने घ्यावा.
2 लिंबा चा रस (हे पण आपल्या आवडीनुसार घ्या)
मोहरी ची डाळ (आपल्या अंदाजाने घ्या किव्हा अर्धी वाटी)
1/2 चमचा हिंग
मीठ चवीनुसार
1/2 चमचा हळद
तिखट (आवडी नुसार)
1 ते दीड वाटी तैल

वरील सर्व जिन्नस आपल्या आवडी नुसार घ्या. कोणाला गोड आवडत नसेल किव्हा जास्त आंबट आवडत नसेल म्हणून, कोणाला हिंग आवडत नसेल तर आपल्या आवडीनुसार घ्या..

कृती :

प्रथम एका कढईत तैल गरम करून घ्या.
तैल थोडं थंड झालं की त्यात मोहरीची दाळ, तिखट, हळद, हिंग टाकून…….. ते तैल थंड होऊ द्या..
(जर गरम तैल या मेथीदाण्या लोणच्यात टाकलं तर ते थोडं ‘चिकट” होते म्हणून तैल थंड होऊ द्या)
तैल थंड होई पर्यंत….एका पसरट भांड्यात मोड आलेले मेथीदाणे टाका..
त्यात चवी नुसार मीठ.. टाका..
गुळ टाका…..
आणि छान हलक्या हाताने मिक्स करा..
आता या मेथीदाण्या च्या मिश्रणावर ते थंड झालेलं लोणच्याचा मसाला(तैल) टाका..
आणि वरून आपल्या आवडीनुसार लिंबाचा रस टाका…
परत छान मिसळा …
तयार मेथीदाण्या चे लोणचे…
आणि बस बस बस…
1 तास मुरू द्या.

दुसरी पद्धतीत….

साहित्य…..
मोहरीची डाळ, तिखट, व हिंग “न” वापरता सरळ कोणत्याही कंपनी चा तयार कैरी लोणच्याचा मसाला वापरावा…..
फक्त तिखट व हिंग जपून वापरा…
कारण कोणत्या कोणत्या लोणच्या च्या मसाल्यात हे पहिलेच हे घटक राहतात म्हणून…
बाकी पद्धत सारखी….
आता तर हे लोणचे किती हिवाळयात हेल्दी आहे हे सांगण्याची गरज नाही.!

आणि मधुमेही लोकांन साठी हे उत्तम ..
(गूळ असल्या मुळे )

आणि अतिशय चवदार ..

हे लोणचे आजिबात कडू लागत नाही…
पहा मग झटपट लोणचे ..

तैल भरपूर असेल तर हे 3 महिने लोणचं टिकते. (फ्रीजमध्ये वगरे ठेऊ नका)