“माझी कन्या भाग्यश्री” मुलींसाठी उत्तम सरकारी योजना

Spread the word

माझी मुलगी
मला मिळालेला देवाचा आशिर्वाद
तरीपण अजूनही समाजात मुलगी नको मुलगाच पाहिजे असा घातला जातो वाद

माझी मुलगी माझ्यासाठी आहे लक्ष्मीचे रूप
तिचा जन्म जेव्हा झाला आनंदाने सुखावलो खूप

तिच्या येण्याने माझे घर झाले जसे वृंदावन
तिच्या प्रतेक गोष्टीने जिंकले सगळ्याचे मन

आपला देश हा पुरुष प्रधान देश आहे. पूर्वीपासूनच आपल्या समाजात स्त्रीला महत्व दिले जात नाही. तिचा जन्म घेण्याआधीच किंवा जन्मल्यानंतर तिचा श्वास बंध केला जायचा. अशा परिस्थितीत जरी मुलींनी जन्म घेतला तरी त्यांना योग्य वागणूक मिळत नसेल त्यांच्या आयुष्याच्या महत्त्वाच्या निर्णयांमध्ये देखील त्यांना विचारलं जात नसे.समाजाची ही अवस्था असताना देखील गोपाळ यांनी आपल्या बायकोला आनंदीबाई यांना शिकवले आणि डॉक्टर बनवले, तसेच ज्योतिबा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यासोबत मुलींची पहिली शाळा सुरू केली. कारण यांना माहीत होते कि जर मुली शिकल्या तरच समाजामध्ये परिवर्तन घडू शकेल आणि कालांतराने ते होत आहे. यामध्येच हातभार म्हणून आपल्या सरकारने “बेटी बचाव बेटी पढाव” हे अभियान 2015 पासून सुरू केले आहे. हे अभियानआपल्या समाजामध्ये मुलींची संख्या जी कमी झाली आहे ती वाढवण्यासाठी आहे. तसेच मुलींना सबलीकरण करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. अनेक दांपत्य घराला वारीस हवा म्हणून मुलाचा अट्टाहास करतात. या अभियाना अंतर्गत मुलींचे आरोग्य, शिक्षण, आहार, स्वच्छता, आत्मसंरक्षण, महिलांचे कायदे इत्यादी समाविष्ट आहे. ऑगस्ट 2017 नंतर जन्मलेल्या एक किंवा दोन मुली नंतर फॅमिली प्लानिंग ऑपरेशन केलेला असेल त्यांना “माझी कन्या भाग्यश्री” या सरकारी योजनेचा फायदा मिळतो मुलीच्या नावावर काही रक्कम फिक्स मध्ये जमा होते. याचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जमा करावे लागतात. हे कागदपत्रे तुम्ही जवळच्या अंगणवाडी सेविका बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क करू शकता. या योजनेचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या मुलीला चांगले भविष्य देऊ शकता तिला स्वतःचे निर्णय घेण्याची क्षमता तेव्हा येईल जेव्हा स्वतःच्या शिक्षण घेऊन पायावर उभी असेल