महिन्यातून दोनदा येणारी मासिक पाळी

महिन्यातून दोनदा येणारी मासिक पाळी……….
अनेक महिलांना महिन्यातून दोनदा मासिक पाळी येते असे का होते तुम्हाला माहिती आहे का,चला तर जाणून घेऊ.

एका महिन्यात दोनदा पाळी आली तर अशक्तपणा येऊ शकतो. कितीतरी महिलांना ही समस्या वारंवार सतावत असते वेळीचउपचार नाही तर गर्भाशयाच्या कर्करोगासारखे गंभीर आजार होऊ शकतात. शरीरातील हार्मोनस संतुलित न राहिल्याने एका महिन्यात दोन वेळा पाळी येते. काही नैसर्गिक पदार्थांचा वापर करुन हे आटोक्यात आणले जाऊ शकते.
मासिक पाळी दोन वेळा येण्याची अनेक कारणे आहेत.
1.तणावात राहिल्यामुळे : जास्त टेंशनमध्ये राहिल्याने हार्मोन संतुलन बिघडते. ज्यामुळे एका महिन्यात दोनदा पाळी येते.
2.जंक फूड खाल्ल्याने : जास्त तळलेले पदार्थ किंवा जंक फूड खाल्ल्याने बॉडीवर विपरित प्रभाव पडतो. यामुळे पीरियड्स निमयित येत नाही.
3.दारु प्यायल्याने : स्मोकिंग केल्याने किंवा दारु प्यायल्याने पीरियड्सची समस्या होऊ शकते. यामुळे हार्मोनची पातळी असंतुलित होते. त्यामुळे अशा प्रकारच्या समस्या वाढतात.
4.गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने : दिर्घकाळ गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने अनेक वेळा एका महिन्यात दोन वेळा पीरियड्स येतात.
5.औषधी घेणे : काही औषधे एस्ट्रोज आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनवर प्रभाव टाकतात. यामुळे एका महिन्यात दोनदा पीरियड्स येतात.

“रोजच्या आहारातील काही पदार्थ आहेत, ज्यांच्यामुळे मासिक पाळी नियमित होऊ शकते.”

> अननस : हे खाल्ल्याने ओटीपोटाचे स्नायू शिथिल राहतात आणि पाळी नियमित होते पीरियड्स नॉर्मल होतात.
> आले: यामुळे पाळीच्या काळात होणा-या वेदनांपासून आराम मिळतो.
> तुळशीचा चहा : यामुळे कंबरदुखी दूर होते. पाळी लांबणीवर जात नाही.
> खसखशिचे दूध : यामुळे पीरियड नॉर्मल होतात. कंबरदुखीपासून आराम मिळतो.
> पपई : हे पीरियड्सच्या काळात होणा-या कमजोरीपासून बचाव करते.

तात्काळ होईल फायदा
> शिंगाड्याचा हलवा : यामुळे दोनदा येणारे पीरियड्स बंद होतात. हे दूधासोबत घेतल्याने लवकर फायदा होतो.
> तांदूळाचे पाणी: यामुळे दोनदा येणारे पीरियड्स बंद होतात.
>कापूर केळी: दोन चमचे केळी कुस्करून करुन त्यामध्ये चिमुटभर कापूर मिसळा, यामुळे पीरियड्स तात्काळ बंद होतात.
अरुणा…..