मसाल्यात वापरणाल्या जाणा-या धन्यांचा असाही होतो फायदा, रोज प्यावे धन्यांचे पाणी

Spread the word

मसाल्यात वापरणाल्या जाणा-या धन्यांचा असाही होतो फायदा, रोज प्यावे धन्यांचे पाणी

स्वयंपाक घरात जेवणाची चव वाढवण्यासाठी धने वापरले जातात. जर याचे पाणी नियमित प्यायले तर अनेक आरोग्य फायदे होतात. यामधील पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम बॉडीच्या अनेक आरोग्य समस्या दूर करतात. आयुर्वेद एक्सपर्ट डॉ. अबरार मुल्तानी सांगत आहेत नियमित धन्याचे पाणी पिण्याचे 10 फायदे…
असे बनवावे धन्याचे पाणी
रात्री एक ग्लास कोमट पाण्यात दोन चमचे धना पावडर टाकून ठेवा. हे सकाळी गाळून प्यावे.
हार्ट डिसिज टाळते
धन्याचे पाणी गुड कोलेस्ट्रॉल म्हणजेच HDL वाढवतात आणि खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कमी करते. हे नियमित प्यायल्याने हार्ट डिसिजचा धोका टाळता येतो.
स्किन इन्फेक्शन टाळते
धन्याच्या पाण्यामधील लिनोलेनिक अॅसिड स्किन इन्फेक्शन आणि एक्जिमाची समस्या टाळते.

इम्यूनिटी वाढते
धन्याच्या पाण्यामधील एस्कॉर्बिक अॅसिड नामक अँटीऑक्सीडेंट बॉडीची इम्यूनिटी वाढवते. यामुळे सर्दी-खोकला आणि वायरल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.
पीरियड्सच्या वेदना कमी
धन्याच्या पाण्यामधील अँटीस्पास्मोडिक प्रॉपर्टीज पीरियड्सच्या वेदना कमी करते.
तोंडाची दूर्गंधी दूर
नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने तोंडाच्या दुर्गंधीची समस्या दूर होते.
लिवर डिसिज टाळते
धन्याच्या पाण्यातील फायबर्स आणि इसेंशियल ऑइल लिवल डिसिज टाळते.
अल्सरची समस्या दूर करते
धन्याचे पाणी कोलेजन टिश्यूचे प्रोडक्शन वाढवते. यामुळे अल्सरची समस्या कंट्रोल होते.
डायबिटीज टाळते
नियमित धन्याचे पाणी प्यायल्याने बॉडीची ग्लूकोज लेवल बॅलेंस राहते. यामुळे डायबिटीजची शक्यता कमी होते.
रक्ताची कमतरता दूर करते
धन्याच्या पाण्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि फोलिक अॅसिड असते. हे नियमित प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
टायफॉइड टाळते
धन्याच्या पाण्यामध्ये एक विशेष तत्त्व डोडेनल असते. हे टायफॉइड बॅक्टेरिया नष्ट करण्यात अँटीबायोटिक्सपेक्षा दुप्पट जास्त इफेक्टिव असते.