मराठी बोला…संस्कृती टिकवा….

Spread the word

मिसेस कोणाला म्हणतात? माहित आहे ? युरोपीय देशात पती पत्नी आयुष्यभर कधीच एकत्र राहू शकत नाही, ही ब्रिटीशांची हजारो वर्षांची परंपरा आहे. घटस्फोट जणुकाही करायचेच असतात. धर्मपत्नीला सोडून ज्या स्त्रियांशी संबंध येतात, तिला मिसेस म्हणतात.
आणि आपला नवरा सोडून ज्याच्याशी संबंध येतात, त्याला मिस्टर म्हणतात. आपल्या संस्कृतीमधे किती सुंदर शब्द वापरलाय, श्रीमती.!
श्रीमती- श्री म्हणजे लक्ष्मी, मती म्हणजे बुद्धी. म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती जिच्यामधे एकत्र असतात, ती श्रीमती. आमची संस्कृती सोडून आम्ही आपल्या धर्मपत्नीची ओळख माझी मिसेस म्हणून करून द्यायला सुरवात केली. मानसिक गुलामी एवढी जास्त की, शब्दापेक्षा, अर्थापेक्षा इंग्रजीत ओळख करून द्यायची हौस जास्ती. अर्थ माहित नाही, म्हणून लाजही वाटत नाही. पण ज्याला अर्थ माहित आहेत, त्या विद्वानाने काय अर्थ काढायचे ?

युरोपमधे मॅडम कोणाला म्हणतात ? वेश्यागृहाना संचालीत करणारी जी मुख्य बाई असते, तिला मॅडम म्हणण्याची पद्धत आहे.
भारतात कोणाला मॅडम म्हणतात ? आम्ही आमच्या शिक्षिकांना मॅडम म्हणतो, अनोळखी स्रियांना हाक मारताना मॅडम म्हणतो. एवढेच नाहीतर कधीतरी आपल्या बहिणीला, आत्तेला, मावशीला पण आदराने मॅडम म्हणतो. शिवीसारखा असलेला शब्द या गुलामगिरी मुळे आदरामधे बदलला गेला.
किती अर्थाचे अनर्थ होतात, पण लक्षात घेत कोण ?

आम्ही दूरध्वनी वरील संभाषणाची सुरुवात हॅलो या शब्दाने करतो. शब्दांचा अर्थ माहित नसतानाही केवळ इंग्रजी बोलण्याच्या प्रतिष्ठेसाठी केलेल्या गुलामगिरीचे हे आणखी एक उदाहरण..!! दूरध्वनी यंत्राचा शोध ज्याने लावला त्या ग्राहम बेलने हे यंत्र सुरु होताच पहिला फोन आपल्या प्रेयसीला लावला. तिने फोन उचलताच त्याने तिला हाक मारली ..”हॅलो !!”
हॅलो हे ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव होते. आम्ही मात्र कुणालाही फोन लावला तरी सुरुवात ग्राहम बेलच्या प्रेयसीचे नाव घेवून करतो. आहे की नाही अज्ञानातील गुलामगिरी….!!

अॅकॅडमीचे आकादमी हे रुपांतरही असाच आमचा मूर्खपणा आहे. अॅकॅडमस नावाच्या व्यक्तीच्या अंगणात प्लुटोची व्याख्याने होत होती. हे ज्ञानसत्र अॅकॅडमसच्या अंगणात चालते म्हणून ती अॅकॅडमी….!!
आम्ही त्याचे रुपांतर केले अकादमी …!!
खर तर आपण प्रबोधिनी किंवा प्रबोधिका म्हणणे अधिक अर्थपूर्ण आहे. पण आम्हाला लाज वाटते अशी नावे द्यायची. विकृत चालेल पण संस्कृत नको, ही आणखी एक मानसिक गुलामगिरी ….!!

पाश्चिमात्य देशात घटस्फोट झाले की मुलांना कुणी सांभाळायचे असा प्रश्न आहे. तिथं अशा मुलांसाठी ज्या संस्था आहेत त्यांना कॉन्व्हेंट म्हणतात. आम्ही इंग्रजी शाळात मुलांना घातलय हे अभिमानाने सांगण्यासाठी माझ मूल कॉन्व्हेंट मध्ये आहे हे कॉलर ताठ करुन सांगतो….!! लाजीरवाण्या गुलामगिरीचे हे उदाहरण ….!!!

असे खूप शब्द आहेत. ज्यांचे अर्थ माहित नाहीत पण आपण ते वापरतो. कारण काय तर मातृभाषेची लाज वाटते आणि इंग्रजीत प्रगती वाटते.

मराठी बोला
संस्कृती टिकवा.