भूकंप

Spread the word

भूकंप

भूकंप म्हटल्यावरच छातीत धडका बसतो आणि यामुळेच भूकंप आल्यावर काय करावे आणि काय करू नये काही सुचत नाही, भूकंप आल्यावर थोडी दक्षता घेतल्यास आपला तसेच इतरांचाही जीव आपण वाचवू शकतो.

भूकंप येणार हे समजताक्षणी घरातून बाहेर येऊन मोकळ्या जागी जाणे. जर बाहेर मोकळी जागा नसेल आजूबाजूला इमारती असतील किंवा जवळजवळ घरे असतील तर बाहेर येऊन काहीच उपयोग होणार नाही. त्याऐवजी घरांमध्येच सुरक्षित ठिकाणी थांबावे, जसे खोलीच्या कोपऱ्यामध्ये किंवा मजबूत फर्निचरच्या खाली सुरक्षित राहू शकतो. उंच इमारतीमध्ये असाल तर खिडकीजवळ उभे राहू नये. अशा परिस्थितीत डोक्या बरोबर शरीराचे इतर संवेदनशील अवयवांना वाचवण्याचे प्रयत्न करायला पाहिजेत. घराबाहेर मोकळ्या मैदानात जाल तर चुकूनही विद्युत खांब तसेच झाडांच्या खाली उभे राहू नये. भूकंप येणार आहे असे समजताच घरातील टीव्ही, फ्रिज अशा प्रकारच्या विद्युत उपकरणांचे पलग काढावे. कुत्रा, मांजर अशा प्राण्यांना भूकंप येणार आहे हे काही क्षण आधीच समजते, तर त्यांच्या हरकती कडे दुर्लक्ष करू नये.

थोडा संयम आणि धाडस केल्याने आपण कोणत्याही कठीण परिस्थिती मधून बाहेर पडू शकतो.