भिजवलेले मनुका

भिजवलेले मनुका

आपले आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेक प्रकारचे सुका मेवा खात असतो.त्यात मनुक्याचा वापर प्रामुख्याने केला जातो. द्राक्ष जेव्हा विशिष्ठ पद्धतीने सुकवले जातात, तेव्हा त्यांना मनुका म्हणतात .

मनुका खाण्याने शरीराला अनेक फायदे होतात.
सुके मनुके खाण्यापेक्षा भिजवलेले मनुके खाल्ल्याने फायदे होतात.

*मनुका हा रात्री भिजवून सकाळी ते पाणी पिऊन मनुकमधील बिया काढून, चावून खावे.
*भिजवलेल्या मनुक्यांमध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फायबरचे प्रमाण भरपूर असते.
*अॅनिमियासारख्या आजारावर मनुका गुणकारी आहे, यात मोठ्या प्रमाणात लोह असते.
*तसेच व्हिटामिन बी कॉप्लेक्सही असते.
*मनुक्याच्या सेवनाने हायपरटेन्शनसारख्या समस्या दूर होतात.
*यातील पोटॅशियम हायपरटेन्शनची स्थिती सुधारण्यास मदत करते.
*ज्यांना वजन वाढवायचे असेल्यास त्यांनी *रोजच्या डाएटमध्ये मनुक्याचासमावेश करावा. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
* एनर्जी वाढवण्याचे कामही मनुका करते.

पाचनशक्ती सुधारण्यासाठी दररोज मनुका खाव्यात.
*मनुका खाल्ल्याने रोगप्रतिकारक क्षमताही वाढते.
*खुप जुना खोकला असल्यास मनुका फायदेशीर आहे.
*मनुके खाल्याने पोट साफ होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होईल. *मनुकांच्या सेवनाने हृदयाचे आरोग्यही राखले जाते.
* दृष्टी सुधारण्यास उपयुक्त ठरतात.
….. अरुणा…..