भरलेले पडवळ (Stuffed Snake Gourd)

Spread the word

 

भरलेले पडवळ
(Stuffed Snake Gourd)

पडवळ ही भाजी नेहमी आहारात हवी कारण अन्नपचनाला मदत करून ऍसिडिटी सारखे आजार ती समूळ नष्ट करते.

कधी बिरडे घालून(वाल, मूग),कधी डाळी घालून(मूग,चणा, मटकी), तर कधी नुसतीच मिरची कांद्यावर परतून कशीही केली तरी छान लागते.

कधी,सुका जवळा, सुकट, सोडे नाहीरल ओली कोलंबी घालून केली तर भले भले न खाणारेही बोटे चाटत चट्टामट्टा करतात.

पण आज मी तुम्हाला एक पार्टी डिश सांगणार आहे आणि तीही शाकाहारी.
हमखास उत्तम होणारी आणि नंबर पटकावून जाणारी.

घ्या तर साहित्य गोळा करायला.

साहित्य (ingredients):-

१. अर्धा किलो पडवळ,(500 grams Snake Gourd)

२. एक वाटी भरून बेसन,
(One katori horse gram floure),

३. एक चहाचा चमचा लाल मिरचीपूड,(one teaspoon red chilly powder})

४. अर्धा चहाचा चमचा हळदपूड,(one teaspoon turmeric powder),

५. अर्धा चहाचा चमचा धणेपूड,(half teaspoon dry coriander powder),

६. एक चहाचा चमचा गोडा मसाला,(one teaspoon vida masala)

७. दोन चहाचे चमचे लिंबाचा रस,(two teaspoon lemon juice)

८. साखर चवीनुसार,(sugar to taste)

९. मीठ चवीनुसार,(salt to taste)

१०. पाव चहाचा चमचा हिंग,(one fourth teaspoon asafotida)

११. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर,(half katori finely chopped green coriander),

१२. ३ पळ्या तेल.(three tablespoons oil)

१३. अर्धा चहाचा चमचा मोहरी,(half teaspoon mustard seeds),

कृती(preparations):-

१. पडवळ घुउन,पुसून,तासून दोन इंचाचे तुकडे करा.बिया काढून पोकळ करा.(clean Snake Gourd and cut into 2”peices),

२. अनुक्रमांक दोन ते अकरापर्यंतचे पर्यंतचे साहित्य एकत्र करून त्यात दोन पळ्या तेल मिसळून घ्या.(mix sr. no. 2 to 11,add 2 tablespoons oil too.)

३. पडवळात हे सारण घट्ट दाबून भरा.(stuff this mix in Snake Gourd)

४. पसरट लंगडी पातेल्यात उल्लेले तेल गरम करून त्यात मोहरी फोडणीला घाला.(heat oil in the pan and make tadka with mustard seeds),

५. पडवळाचे तुकडे त्यात पसरून पाण्याचा हबका मारा.मंद गॅसवर पाण्याचे झाकण ठेवून शिजवा.(put stuffed snake gourd prices in pan,sprinkle water n keep lid with water)

६.पाच मिनिटांनी झाकण काढून सर्व
तुकडे पलटुन घ्या.लागल्यास पुन्हा पाण्याचा हबका मारून पाच मिनिटे शिजवा.(after five minutes, remove lid and change the sides.if need sprinkle water.keep gas off after five minutes.)

७. नुसत्या वरणभात,आमटीभात, सारभात कशाबरोबरही आस्वाद घ्या. किंवा पार्टीसाठी एक विशेष आणि झटपट होणारी डिश बनवाआणि पाहुण्यांना खुश करा.(have taste with any kind of dal rice or make a spl dish for party and happy your guests).