बायको

Spread the word

( एक सुंदर व्यक्तिमत्त्व )
बायको म्हणजे कोण???

बायको ह्या शब्दाला जर फोडले तर “बा” म्हणजे तुमच्या बाजूने भक्कम पणे उभी राहणारी “य” म्हणजे येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे तोंड देणारी आणि “को” म्हणजे कोणासाठीहि नाही तर फक्त आणि फक्त नवऱ्यासाठी जगणारी !!! सुख दुःखात साथ देणारी म्हणून तिला बायको असं म्हंटलं जात!!! मैत्रिणीला सहज समजून घेतलं जातं पण बायकोला मैत्रिण बनवलं तर आयुष्य किती सुंदर होईल शेवटी नवऱ्यापेक्षा अधिक जवळचा मित्र तिच्यासाठी कोण असेल .
बाहेर मैत्री आणी मैत्रिणी शोधण्यापेक्षा बायको मध्येच मैत्रीण सापडली तर तिला आणखी काय हवं !!!!!! प्रत्येक नवऱ्याला वाटत बायकोसाठी खूप काही करावं लागतं पण सत्य परिस्थिती अशी असते तिला लागते नवऱ्याची साथ!!!! हातात भक्कम हात!!! समजून घेणार हृदय !!! इतकं प्रेम कि तिला माहेरच्या लोकांची आठवण हि ना यावी !!!! एक जवळचा मित्र !!! आणि जो अहंकार बाजूला ठेवून तिच्याशी वागेल !!! ज्याच्या जवळ इतकं मन मोकळं करता येईल की मैत्रिणीची हि गरज नाही भासणार!!!” जिच्या डोळ्यात आपल्यामुळे कधीच अश्रू नाही येणार !!!!!! एक स्त्री म्हणून मान!!! आणि तिच्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी भक्कम साथ बस इतकंच मिळालं कि ती झोपडीला हि स्वर्ग बनवेल !!!!! आणि भाकरीचा तुकडाही तिला पंचपक्वान्न वाटेल आणि नवऱ्याच्या मिठीत स्वर्ग सुख बस आणखी काहीही नको असत कुठल्याही बायकोला म्हणून म्हणते. मग ती एक सुन म्हणून… एक बायको म्हणून… एक वहिनी म्हणून… एक आई म्हणून… एवढ्या वर्षानंतर आयुष्याच्या शेवटच्या स्टेशनवर आलो तरी ज्याच्यासाठी स्वतःला विसरून त्याची झाले… पण तो विचारतो तू कोण आहे?… मी आहे म्हणून तू आहेस… मी नसतो तर तुला कोणी विचारले नसते… पण तरी त्याचा राग न करता… त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारी त्याला माझी गरज याची जाणीव असणारी… म्हणजे बायको नाही कां?

बायको वरील पोस्ट टाकणं म्हणजे तिला समजणं नसत बायको म्हणजे एक संसारासाठी सतत तेवणारी ज्योत असते !!!! स्वतःला विसरून नवऱ्यासाठी जगणारी आयुष्यभराची साथ असते!..

अनामिक