पावटा

Spread the word

दुपारची वेळ,,, माझी पुर्ण कामं झालेली. फोन हातात घेतला तेवढ्यात कोणीतरी थरथरत्या आवाजात आरोळी ठोकली “पावटा घ्या ,,पावटा” माझं घर रोडवर आहे त्यामुळे आवाज खूप येतो. सतत कोणीना कोणी फेरीवाले येत आसतात.
पुन्हा एकदा तोच आवाज कानावर आला. मला रहावलं नाही,म्हणुन मी बाहेर येऊन बघितलं तर समोर 75 ते 78 वर्षाचे आजोबा हातात छोटीशी कापडी पिशवी घेऊन ऊभे होते. इतकं वय असुनही आजोबांचा चेहरा आगदी तजेलदार होता. चालण्यात बाणेदारपणा होता, बोलण्याची लकब घरंदाज होती. पण मला एक प्रश्न पडला की ना हातगाडी ना सायकल मग बाबा पावडा आलेत कश्ययात घेऊन?? मग मि विचारलं बाबा पावटा कुठाय? बाबा बोलले -” हे काय या पिशवीत. ”
मी जवळ जाऊन बघितलं तर आतमध्ये कडधान्य पावटा होता. साधारण पाच किलो आसेल. मला आश्चर्य वाटलं पण मी ते दाखवलं. मी विचारलं,,,,बाबा भाव काय?
25 रुपये पावशेर बाबा थरथरत्या आवाजात बोलले. खरं तर वाळलेला पावटा वीस रुपये पावशेर आसतो हे मला माहीत होते, पण का कोण जाणे मी भाव केला नाही. मी बाबांना बोलले बाबा मला तिन किलो पावटा हवाय. बाबांचा चेहरा एकदम खुलला. त्यांनी लगेच पिशवीतून तराजु काढुन मला माफ दिलं. तराजु काढताना पिशवीत गावरान शेवग्याच्या शेंगा होत्या त्या मला दिसल्या, मि विचारलं बाबा ,,,शेंगा विकायलाच आणल्यात ना? व्हय गं पोरी!! बाबा बोलले. त्या दहा मिनिटांच्या व्यवहारात बाबा मला आपलेसे वाटायला लागले. शेंगा साधारण एक किलो आसतील.मी म्हटलं,,, बाबा,,शेंगा कशा? पोरी पंचवीस रुपयांच्या सगळयाच घे!! मी शेंगा घेतल्या. बाबांकडे आता एक,, दोन किलो पावडा राहिला आसेल. शेजारच्या सख्याना आवाज देऊन देऊन तो हि खपवला. आता बाबाकडे फक्त तराजू पारडं राहिलं.बाबा खुश होते. बोलले बरं झालं ऊसाच्या आधि संपला. नाहितर उन्हात फिरावं लागलं आसतं.
शेवटी न रहावुन विचारलं.. बाबा तुमचं खुप वय झालंय,,, का करता हे काम?? बाबांच्या डोळ्यात टचकण पाणि आलं. बोलले पोरी माझं चागलं आहे,,, दोन पोरं आहेत मला,,, इथच एक पुण्यात आसतो आणि एक गावाला आसतो. मीच करतो हे काम!! पण आजोबांच्या डोळ्यातल्या पाण्याने मला सगळं काही सांगितलं होतं. किती स्वाभिमान होता आजोबांकडे याही वयाय!!
मैत्रीणींनो हात जोडून विनंती करते आपल्या सासु सासऱ्यांना आईवडिलांसारखंच सांभाळा.
हा प्रसंग खुप विदारक होता. विचार करा जर आपल्या आई वडिलांची आशी दशा झाली तर काय फिल कराल आपण??
चला आजपासून आपण एक नवीन संकल्प करुया
“वृद्धाश्रम बंद पाडुया. ” सुरूवात आपल्या घरापासून. आता आसं कोणीही म्हणू नका कि माझी सासु खुप खाष्ट आहे. माझे सासरे खुप कडक, रागिट आहेत. ते जे पण आहेत आपले आईवडिल आहेत, आणि आईवडिलांना कोणीही झटकु शकत नाही.
प्राजक्ता जगताप