पायासूप-तुम्हीपण पाय,कम्बर मजबूत करा.

Spread the word

पायासूप :-

“आला थंडीचा महिना,पटकन शेकोटी पेटवा”असं एक गाणं आहेना? ते आठवण्याचं म्हणजे सध्या चालू असलेला थंडीचा महिना.मुंबईत थंडीचं प्रमाण तसं कमीच झालंय, माझ्या लहानपणी नोव्हेंबरपासून जी थंडी सुरु व्हायची ती होळी पेटली कीच कमी व्हायची.आणि थंडीचे म्हणून जे खास पदार्थ शिजले जायचे त्यात पायासूप हमखास असायलाच पाहिजे.दर रविवारी मटणासोबत पायासूप असायचेच.आणि तेही दिवसभर किंवा कमीतकमी बारा तास शेगडीवर रतरटत शिजलेले असायचे.

दिवसभर त्या मंद शेगडीवर शिजणारा घरभर दरवळणाऱ्या खमंग वासाने जीभ खवळून जात असे. शेजारी पाजारी वास जात असे.”पाया शिजतोय वाटतं?”अशा चौकशाही होत,एक दोन वाट्या आपला नंबरही लावीत असत.

तेव्हा मटण सक्काळी सात वाजताच घरी येत असे.मटणाबरोबर पायाही येत.तेव्हा आणि आताही त्याला फक्त पाया म्हटले जाते.पाया म्हणजे बकऱ्याचे पाय.लेगपीस म्हणजे गुढघ्या खालचे खुरपर्यंतचे पाय.हे आणतानाच सोलून,स्वच्छ करून आणले जात.

तरीही मग घरी आल्यावर सुरू होई त्यांची सफाई. त्याला चिकटलेले केस काळजीपूर्वक काढावे लागत. त्यासाती त्यांना चिमट्यात धरून किंवा जाळीवर ठेवून सर्व बाजूने फिरवून भाजले जायचे. असं केल्याने आतला बोनमॅारोही सील व्हायचा.मग वाहत्या पाण्याखाली धुतले जायचे.मग आले, लसूण, मिरची, कोथिंबीर,पुदिना याचे वाटण लावून,थोडा बारीक कापलेला कांदा मिसळून त्यांना तासभर तसेच ठेवले जायचे.

बकरा हा उंच डोंगरावर चढण्यात पटाईत असल्याने त्याचे पाय मजबूत असतात.त्यातला बोनमॅरॉ खाल्ल्याने पाय व कम्बरदुखी तत्काळ थांबते,असा अनुभव आहे त्यामुळे संधीवातामुळे दुखणारे पाय, बाळंतपण झाल्यामुळे दुखणारे कंबर व पाय,यावर हे सूप म्हणजे तत्काळ आराम देणारे औषध.लहान मुलांचे पाय मजबूत व्हावेत म्हणून त्यानाही आवर्जून हे टॉनिक म्हणून नियमित दिले जायचे.आणि अजूनही आम्ही ते नियमित घेतोच. फक्त पूर्वीसारखे शेगडीवत न शिजवता प्रेशरकुकरमध्ये केले जाते, अर्थातच आता रात्रभर शिजवायची गरज नसते.पण तरीही आदल्या दिवशी करून ठेवले तर मस्त लागते.

हैद्राबादला तर या दिवसातच नव्हे तर कायमच सकाळी ,नल्लीनिहारी नि पाव हा सकाळचा नाश्ता असतो.दिवसभराची एनर्जी त्यामुळे येते.सकाळी कित्येक विक्रेते सायकलवरून हे पदार्थ विकीला घेऊन येत असतात.तासाभरातच त्यांचे पदार्थ संपून जात असावेत इतक्या प्रमाणावर लोक खरेदी करीत असतात.किती मस्त!बायकांना थंडीत घाईने उठून काही करायलाच नको,ही नल्ली निहारीही रात्रभर मंद शेगडीवर शिजवून केलेली असते,असे समजले.

चला तर मी तुम्हाला माझी कृती सांगते.तुम्हीपण पाय,कम्बर मजबूत करा.

घ्या साहित्य जमवायला.

साहित्य(ingredients):-

१. आठ पाय,( 8 payaa)

२. दोन चहाचे चमचे आले+लसूण+हिरवी मिरची+कोथिंबीर+पुदिना पेस्ट.(two teaspoons ginger+garlic+green chili+ green coriender+pudina pest),

३. एक मध्यम बारीक चिरलेला कांदा.(finely chopped one medium onion),

४. एक मध्यम उभा जाड कापलेला कापलेला कांदा.(big cuts one medium onion),

५. पाव वाटी सुके किंवा ओले खोबरे.माझी आवड ओले खोबरे.(one fourth katori dry coconut or grated coconut,my likeng grated coconut),

६. एक हिरवी मिरची.(one green chilly),

७. अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर.(half katori finely
chopped green coriander)

८. एक चहाचा चमचा लाल मिरची पूड.(one teaspoon red chilly powder)

९. अर्धा चहाचा चमचा धणेपूड (half teaspoon dry coriander powder),

१०.पाव चहाचा चमचा हळदपूड.(one forth teaspoon turmeric powder)

११. पाव चहाचा चमचा गरम मसालापूड.(one forth teaspoon
Garam masala powder),

१२. खडा मसाला पुढीलप्रमाणे- दोन तमालपत्र+ चार दालचिनी काड्या + दोन लवंगा + दोन स्टारफुलं + एक अख्ख्या जायपत्री +दोन मसाला वेलची+ चार हिरव्या वेलची.(khada masala – 2 bayleaves + 4 pieces of cinaman +2 cloves + 2 star anis+ओने maje + 2 black cordmum + 4 green cordomum)

१३. तेल पाव वाटी.(one four katori oil)

१४. मीठ चवीनुसार,(salt to taste)

कृती(preparations):-

१. पाया जाळीवर ठेवून सर्व बाजूनी नीट भाजून घ्या आणि वाहत्या पाण्यासाली नीट धुवून घ्या.अर्धे आले+लसूण+ मिरची+ कोथिंबीर +पुदिना वाटण चोळून आणि अर्धा चिरलेला कांदा मिसळून एक तास ठेवा.(roast the payaa n wash and marinate with half pest of ginger+garlic+ green chilly+ green coriender+mint leaves,+half finely chopped onion n rest for hour)

२. एका कुकरमध्ये अर्धे तेल गरम करून त्यात अर्धा खडा मसाला फोडणीवर घालून त्यात पाया घालून परता. पाय बुडतील इतके गरम पाणी घालून उकळी येउद्या,आता झाकण लावून प्रेशर आले की,आच मंद करा.अर्धा तास शिजूद्या.(ही स्टेप रात्री करून तबेवू शकता,पाया मस्त मुरतो.)(heat oil in the cooker n make tadka of khada garam masala,add paaus and sakte well.add half litter hot water and after one boil. close with lid. Low the flame and cook for half an hour)(you can make this step in prenight.it goes well marinate)

२. अर्ध्या तासाने गॅस बंद करा,प्रेशर उतरेपर्यंत थांबा.(after half an hour off the flame,wait for down the pressure.),

३. आता दुसऱ्या पातेल्यात उरलेल्या तेलाची खडा मसाल्याची फोडणी करून उरलेला कांदा घाला,थोडा परतून त्यात उरलेले हिरवे वाटण घालून परता.(heat oil in other. big pan and make tadka with remain khada gram masala.add half finely chopped onion,saute n add remain green masala pest n saute till rawness of green pest)

४. लाल मिरचीपूड ,हळदपूड, धणेपूड घालून परता.कुकरमधला पाया त्यातल्या पाण्यासह ओता.एक लिटर गरम पाणी घालून उकळी येउद्या.आच कमी करून,पाण्याचे झाकण ठेवून अर्धा तास उकळूद्या.(add red chilly powder, turmeric powder, n dry coriander powder .Saute wrll
Add payaa with it’s water. Add one litter hot water and boil on low flame for half an hour),

५. जाड कापलेला कांदा,खोबरे चमचाभर तेलावर भाजून उतरताना त्यात हिरवी मिरची व कोथिंबीर घालून ढवळा.लगेच उतरा. मिरच्या व कोथिंबीर कांदा खोबऱ्याखाली दडपून टाका,थंड झाल्यावर बारीक वाटून घ्या.(roast the onion with big cut,and coconut on little oil.add green chilly n been coriender,saute n off the gas.keep green chiLy n coriender bineath the roasted hot onion and coconut,cool it n make a smooth pest}

६. हे वाटण पायात घालून पुन्हा मंद आचेवर पाण्याचे झाकण ठेवून, अर्धा तास उकळू द्या.पाणी कमी झाले असेल तर गरम पाणी घालून वाढवा.पातळ रस्सा ठेवा.(add rosted pest in paayaa n boil till half an hour.if needed ad hot water.texture of soup is thin.)

७. गरम मसालापूड व मीठ घालून पाच मिनिटे झाली की गॅस बंद करा.
(Add garam mala powder n salt.after five minutes off the gas.)

८. गरमागरम आस्वाद घ्या.(serve n taste hot)

नुतन_सावंत