नेहमी गुप्त ठेवाव्यात ह्या सात गोष्टी

Spread the word

 

नेहमी गुप्त ठेवाव्यात ह्या सात गोष्टी :-

१) अपमान

जर आपल्याला कोणत्याही कारणाने अपमानाला तोंड द्यावे लागले असेल तर ही गोष्ट आपण गुप्त ठेवणेच आपल्या फायद्याचे असते. कारण जर इतरांना हे माहिती पडले की आपल्याला अपमानाला तोंड द्यावे लागले होते तर ते आपली खिल्ली उडवू शकतात, चेष्टा करू शकतात.

२) धन हानि / आर्थिक नुकसान

आजच्या काळात पैसा, धन यांनाच कोणत्याही व्यक्तीच्या शक्तीचे परिमाण मानले जाते. बहुतांश परिस्थितीत पैशाच्या पार्श्वभूमीवरच नाती निभावली जातात आणि मैत्री देखील केली जाते. तेव्हा आपल्याला कधीही आर्थिक नुकसानीला तोंड द्यावे लागले तर आपण ही गोष्ट गुप्त ठेवली पाहिजे. कारण आर्थिक नुकसानाची गोष्ट जर आपण इतरांना सांगितली तर अनेक लोक आपल्यापासून दूर जाऊ लागतील. आर्थिक नुकासानातून सावरण्यासाठी आर्थिक मदतीची गरज असते. परंतु ही गोष्ट जाहीर झाली तर कोणीही आपल्याला आर्थिक मदत करणार नाही. त्याचबरोबर, जर आपल्याकडे खूप सारा पैसा असेल तर ही गोष्ट देखील गुप्त ठेवली पाहिजे.

३) घरगुती भांडण – तंटे

बहुतेक सर्व परिवारांमध्ये वाद – विवाद होतच असतात. ही अगदी सामान्य गोष्ट आहे. परंतु आपसातल्या या भांडणाविषयी बाहेर कोणालाही सांगता कामा नये. असे केल्यामुळे समाजात आपल्या परिवाराची प्रतिष्ठा कमी होते. परिवाराचे वाईट चिंतणारे लोक आपल्या आपसातील भांडणाचा गैरफायदा घेऊ शकतात.

४) गुरुमंत्र

आपल्या गुरूने आपल्याला दिलेला मंत्र गुप्त ठेवला पाहिजे. गुरु मंत्र तेव्हाच सिद्ध होतात जेव्हा ते गुप्त ठेवले जातात. मंत्र गुप्त ठेवल्याने लवकरच शुभ फळ प्राप्त होते.

५) केलेलेदान

गुप्त दानाचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. असे मानले जाते की जे लोक गुप्त स्वरुपात दान करतात, त्यांना अक्षय पुण्यासोबातच देवी – देवतांच्या कृपेने सर्व सुख – सुविधा प्राप्त होतात. दुसऱ्यांना सांगून सांगून दान केल्याने पुण्य प्राप्त होत नाही.

६) पद – प्रतिष्ठा

जर आपण एखाद्या मोठ्या पदावर असलो आणि समाजात आपल्याला खूप मान – सन्मान मिळत असेल तर ही गोष्ट देखील गुप्त ठेवली पाहिजे. कोणा दुसऱ्या व्यक्तीसमोर या गोष्टीचा उल्लेख केला तर त्यातून अहंकाराचा भाव निर्माण होतो. अहंकार हा अधःपतनाचे कारण बनतो आणि त्यामुळे आपली प्रतिष्ठा कमी होऊ शकते.

७) एकांतवास

स्त्री – पुरुषांनी रातीक्रीयेच्या वेळी एकांताला विशेष महत्व दिले पाहिजे. या कृत्याशी निगडीत असलेल्या गोष्टी देखील गुप्त ठेवल्या पाहिजेत. जर या गोष्टी इतरांना माहिती झाल्या तर ते आपले चरित्र आणि सामाजिक जीवनासाठी चांगले नसते.

टिप – आपल्या जिवनात अनेक प्रकारचे उतारचढाव येत असतात , अश्यावेळी आपण त्यातून बाहेर पडण्यासाठी आपले दुःख ईतरांना सांगत असतो परंतू त्यात अशाकाही गोष्टी ह्या समाजात जानारनाही व त्याचा दुष्परीनाम आपल्या पुढिल आयुष्यात आपल्याला भोगावे लागू नये यासाठी आपण नेहमीच सतर्क रहायला हवे.