निरोप

Spread the word
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

भरारी 1: प्राधिर्घ विरहा नन्तर होणारी थोडी निवांत भेट आणि काही क्षणा नन्तर येणारा पुन्हा विरह तसा दोघांसाठी जीवघेणाच असतो पण तिच्यासाठी थोडा जास्तीच. आल्यापासून त्याच्या मिठीत निवांत झालेली ती, रुजलेली ती, मोहरलेली ती, फुललेली ती, एकरूप झालेली ती आणि तृप्त झालेली ती थोडी निवांत होते न होते तोच त्यांच्या जाण्याचा क्षण काही घडीवर येऊन ठेपतो. सारखं घडाळ्याकडे पहाणं आणि वाढत चाललेली हुरहुर. मनाची होणारी तगमग आणि सारखे भरून येणारे डोळ्यातील पाणी शर्थीने परतवण. एक तास, अर्धा तास, पंधरा मिनिट, दहा मिनिट, पाच मिनिट, आणि वेळ झाली निघायची आता. निघणं अपिहार्य असतं तरीही नको वाटतं. जाताना परत मिठी मारण. त्याच कपाळावर ओठ टेकवण आणि इतक्या वेळ शर्थीने पर्तवलेल्या आसवांनी ऐनवेळी सोडलेली साथ. डोळे पुसत त्याने काढलेली समजूत. परत भेटीच दिलेलं वचन आणि दोघांनी धरलेली आपापली वेगवेगळी वाट. नजरेआड होई पर्यंत सारखं वळून वळून बघणं आणि नजरे आड होताच तिचा मोबाइलला आलेला म्यसेज. ” शोना, आय लव यू. आई मिस यू सो मच. ” बांध फुटतो, वाहू लागतो.

प्रिस्का

error: Content is protected !!