दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा ?

Spread the word

दर पौर्णिमेला सत्यनारायण का करावा ? :-

जन्म देण्याचे काम ब्रम्हदेव करत असतात व जन्म ते मृत्यु पर्यंत पालनपोषण करण्याचे काम , जबाबदारी भगवान विष्णुंवर अाहे अाणि मृत्युनंतर भगवान शंकर यांची जबाबदारी असते म्हणुन मेल्यानंतर मृत अात्म्यांना मुक्ती देण्याचे कार्य भगवान शंकराच्या स्थानी असते… श्रीक्षेञ ञ्यंबकेश्वर या ठिकाणी नारायण नागबली हा विधी केला जातो..अापल्या घरात पुरेसे न पडणे , अार्थीक अडचणी येणे , अन्न चविष्ट न लागणे , अन्न खाऊन तृप्ती न होणे , महिनाभर पुरणारे धान्य महिनाभर न पुरता ते लवकर संपणे , घरात पैसा नको असलेल्या ठिकाणी खर्च करावा लागणे , पैसा घरात अाला म्हणजे त्याला वाटा फुटुन अनाठायी पैसा खर्च होणे..वरील सर्व बाबींचे कार्यकारण भाव अापणास समजत नाही..असे प्रश्न ज्या वेळेस श्री स्वामी समर्थ केंद्रात येतात त्यावेळेस सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला घरच्याघरी करण्याचा सल्ला दिला जातो….सतत १२ पौर्णिमांनंतर त्या व्यक्तीचे वरील प्रश्न बर्‍याच अंशी सुटलेले असतात..बरेच चांगले अनुभव लोकांना अालेले दिसतात याचे कारण असे की , अापण जी सत्यनारायण पुजा करतो ती धान्याची पूजा असते..जुनी मंडळी अशी म्हणतात की घरचं धान्य सरत नाही व विकतचे धान्य पुरत नाही…कारण विकतचे अाणलेल धान्य अापल्या घरी अाल्यानंतर अापण ते खाल्याने जाणकार मंडळी असे म्हणतात.. ” ओकलेलं खाल्लं तर एकवेळेस ते चालेल परंतु टोकलेले खाऊ नये ” ‘ जैसे खावे अन्न वैसे उपजे मन’ या सर्व गोष्टी अापल्या कुटुंबावरती व अापल्यावर किती वाईट परिणाम करु शकतात… घरातील माणसे एकविचाराने न राहणे , घरात अन्नधान्य , पैसा पुरेसा न पडणे , या सर्व गोष्टींचे मूळ अापल्याला या ठिकाणी दिसुन येते…म्हणुन अापल्या पुर्वजांनी फार बारीक अभ्यास करुन घरच्या घरी पौर्णिमेला सत्यनारायणची पूजा करण्याची प्रथा यासाठी घालुन दिली अाहे…अापल्या घरी असलेले अन्न व धन पालनपोषनाची जबाबदारी भगवान विष्णु यांच्याकडे असल्याने , भगवान विष्णुंच्या अधिष्ठानात घरातील धान्य व पैसा सत्यनारायणाच्या पूजेच्या माध्यमातुन जर अापण पुजन केले तर त्या पैशाचे अाणि धान्याचे सर्व दोष नाहिसे होतात…तसेच तो पैसा धन , पैशात पैसा टाकल्यास त्याला बरकत राहते..त्या ठिकाणी पविञता येऊन घरात सुख , शांती , अानंदी प्रसन्न वातावरण राहण्यास सुरुवात होते…..” सत्यनारायण पूजा ” ही दर पौर्णिमेला प्रदोषकाळी (सूर्यास्ताअगोदर व नंतर २४ मि. ) करावयाची असते..ऐश्वर्य , धन , संपत्ती यांचे मालक विष्णु व माता लक्ष्मीदेवी यांच्या कृपाप्रसादासाठी घरच्याघरी पूजा करावी..मकर संक्रांतीच्या दिवशीपण सत्यनारायण करावा…पूजेचे साहित्य :- १ पाट , १ चौरंग , चौरंगाभोवती अांब्याचे चार डहाळे , चौरंगावर अर्धा मिटर पांढरे कापड , ताम्हणात तांदुळ घेऊन त्यात बाळकृष्ण ठेवावा..तीन सुपार्‍या विड्याच्या पानावर ठेवाव्यात…(पहिली सुपारी-गणपतीची , दुसरी कुलदेवतेची , तिसरी वरुणाची ) वरील पध्दतीने मांडणी करुन सर्वांची पंचोपचार पूजा करावी..नंतर रव्याचा प्रसाद करुन नैवेद्य , धूप , दीप दाखवून सत्यनारायणाची पोथी वाचावी…पोथी वाचून झाल्यानंतर अन्नाचा नैवेद्य दाखवावा..अारती करुन प्रसाद वाटावा..हा प्रसाद कुटुंबातील व्यक्तिंनीच खावा बाहेरच्या व्यक्तीला प्रसाद देऊ नये..नातेवाईकांना सुध्दा देऊ नये…यानंतर पूजेतील उरलेले गहु-तांदुळ त्या त्या धान्यात टाकावे..यामुळे धान्याचे दोष नाहीसे होऊन ते पविञ होतात..कारण जेंव्हा धान्य दुकानातुन विकत अाणत असतो त्यावेळी अनेकांचे हात त्या धान्याला लागले असतात..त्याचे दोष नाहीसे होण्यासाठी , ते पविञ करण्यासाठी दर पौर्णिमा , संक्रातीला सत्यनारायण करावा…या विधीमुळे घरात सुखशांती नांदते , धनधान्य पुरते , अार्थीक स्थिती सुधारते…