त्वचा विकार वर महत्वपूर्ण सोपे उपाय :

त्वचा विकार वर महत्वपूर्ण सोपे उपाय :

दोन चमचे नारळाच्या तेला मध्ये एक चमचा टमॅटोचा रस एकत्र करून खाज असलेल्या जागेवर मालिश करावे,नंतर गरम पाण्याने अंघोळ करणे.

जिरे गरम पाण्यात वाटून ते खाज,दाह असलेल्या जागी लावणे.

सफरचंदाची साल खाज असलेल्या जागी घासावी.

5 ग्रेम काळी मिरी वाटून अर्धा चमचा गायीच्या तुपात एकत्र करून ते घेतल्या मुळे सगळ्या प्रकारचे त्वचा विकार कमी होतात.

ताजे नारळ पाणी आणि टमॅटो रस एकत्र करून लावावे.

दुधातणी मिसळून कापसाच्या बोतीने शरीरावर लावावे आणि थोड्यावेळाने अंघोळ करावी.

लाल टमॅटोचा रस काही दिवस प्याल्याने बरेच त्वचा विकार बरे होतात.

गरम पाण्यात लिंबू पिळून अंघोळ केल्याने त्वचा विकार कमी होतात.

खाज होत असलेल्या जागे वर अर्धा तास मध लावून ठेवणे व नंतर अंघोळ करणे.

लिंबू कापून त्या मध्ये तुरटी पावडर भरून खाज असलेल्या जागे वर मालिश करणे.

राईच्या तेलात लसूण जाळून ते थंड झाल्यावर त्या तेलाने मालिश करणे.

ओवा पाण्यात उकळवून त्या पाण्याने खाज असलेली जागा स्वच्छ करणे.

केळीच्या खोडात आतील भाग लिंबू रसात वाटून तो दाह, खाज असलेल्या जागी लावणे.

काही दिवस मुळ्याची बी आणि मुळ्याची सुकी पाने लिंबू रसात वाटून गरम करून लावणे .