त्रिज्जा

Spread the word

“आणि त्या बदलल्या”….भाग 1

विवेकराव आणि विभाताई यांना दोन अपत्य…मुलगा नचिकेत…
इंजिनिअर होऊन चांगल्या कॉलेज मधून MBA केले…कॅम्पस शिलेक्शन झाले…
आणि सुरवातीलाच पंधरा लाखाचे मुंबईला पँकेज मिळाले…मुंबईतल्या मुंबईत नोकरी मिळाली म्हणून घरचे सगळे खुश होते…
त्याच्या पेक्षा तीन वर्षाने बहीण लहान…निकिता तिचे नाव…
इंजिनिअरिंग शेवटच्या वर्षाला…झाली एकदाची इंजिनीअर… तिलाही मुंबईला चांगल्या कंपनी मध्ये नोकरी लागली…छान मजेत सगळं चाललं होतं… विभाताईंना सगळं काम घरी करायची भारी हौस…
म्हणायच्या त्यनिमित्याने शरीराचा व्यायाम होतो…
त्यामुळे त्यांनी कोणत्याच कामाला कधी बाई लावली नाही…मुलांचे डबे..धुनी ,भांडी…आल्यागेल्याच सगळं करायच्या…

मुलं नोकरीला लागली…म्हणायची आई खूप कष्ट केले…आता निदान धुनी, भांडी,केर, लादी याला बाई लाव…झेपत नाही ग तुला..!
मग सारखं काहींना काही दुखत असत…निकिता तिचाही पगार चांगला होता…तीही म्हणायची आई खरंच आता बाई ठेव…

आणि तुला फिटनेस साठी योगा क्लास लाव…walking कर…तुझे काही छंद असतील तर ते कर…

इतकी गुणी मुलं त्यामुळे…आई वडील आपल्या कर्तृत्ववान मुलांबद्दल अभिमान बाळगून होते… एक दिवस अचानक विभाताईंना ताप भरला…डॉक्टर कडे गेल्या…औषध घेतलं…पण ताप काही उतरला नाही… दोन तीन दिवस झाले…शेवटी डॉक्टर म्हणाले…ब्लड टेस्ट करून घ्या…आणि ब्लड टेस्ट केले… “टायफाईड निघाला”… ऍडमिट केले दोन दिवस…आई विना दोन दिवस घराचा पार उकिरडा झाला…त्यात निकीताला जेवण सुद्धा बनवता येत नव्हते…आज तिला आठवलं…आई म्हणायची…

“अग थोडं तरी करून पहा…निदान लक्ष तरी ठेव करतांना”…पण बाईसाहेब बेफिकीर…आज तिला राहून राहून वाटलं…खरंच आईच ऐकायला पाहिजे होत…
शेवटी सगळ्या कामाला बाई लावावीच लागली…आणि निकिताने सुटकेचा निश्वास घेतला…निकिता ने तीन वर्षे नोकरी केली…आता आईबाबांनी तिच्या लग्नाचा विषय काढला…

नचिकेतला सुद्धा म्हणाले तुही आता लग्न कर…म्हणजे आम्ही दोघे आमच्या जबाबदारीतून मोकळे…आणि हो तुम्ही कोणी शोधून ठेवले असेल तर तसेही सांगा… म्हणजे चिंताच मिटली…

दोघेही एकसुरात म्हणाले
आईबाबा हि जबाबदारी तुम्हालाच घ्यावी लागेल…आम्ही काही त्या भानगडीत पडलो नाही…मग विभाताई आणि विनायकराव जोरात वधू, वर संशोधानाच्या कामाला लागले…दोन तीन वेबसाईट वर दोघांचेही नाव नोंदवले…आता त्याचा दिनक्रम झाला…मुलामुलीचे फोटो पहायचे…त्यांना आवडले तर मुलांना दाखवायचे…त्यानां पसंत असेल तर नंबर घेऊन कॉल करायचा…

कोणाची पत्रिका जुळायची नाही तर कुणाच काही… अशातच पुण्याचं एक स्थळ नचिकेतला सांगून आलं…

विनायक रावांच्या कुणी ओळखीच्या माणसाने सुचवलं म्हणे…त्यानीं फोन करून सगळी माहिती सांगितली…व्हाट्सअप्पवर मुलीचा फोटो आणि इतर बायोडाटा पाठवला…मुलगी खरंच खूप सुंदर होती…इंजिनीअरिंग करून पोस्ट
ग्रॅजुएशन केले होते तीने…नचिकेतला मुलगी आवडली…
त्रिज्जा तीच नाव…
विभाताईंनी पत्रिका जुळते का पाहिलं…उत्तम जुळत होती…मग पुण्याला जाऊन मुलगी बघण्याचा कायक्रम झाला…

पाहताक्षणी मुलगी पसंद पडली…लगेच नचिकेतने लग्नाला होकार दिला…आणि थाटात लग्न पार पडले…तिची कंपनी मुंबईला सुद्धा होती…त्यामुळे तिची लग्न झाल्याबरोबर मुंबईला बदली झाली…

आणि त्रिज्जा नचिकेतचा संसार सुरु झाला… त्रिज्जा मुळातच खूप समझदार…आणि संस्कारी मुलगी होती…ती या घरात आली…आणि
नावाप्रमाणेच…

कुटूंब नावाचं वर्तुळ तिने पूर्ण केलं…

विभाताई सून आली आणि बदलल्या…वरच्या कामाची बाई ठेवली…पण चपाती साठी बाई ठेवली ती मात्र बंद केली… का तर म्हणे आता सून आली घरात…? थोडं तरी काम् करायलाच पाहिजे..! अरे काय हा विक्षिप्त प्रकार..!

मुलगी होती…तिला काहीच करता येत नाही म्हणून बाई लावली..! आणि सून आली तर काढून टाकली..! हाच नियम मुलीला का नाही लावला..?

पण त्रिज्जा जात्याच खूप समझदार…सकाळी पोळी भाजीचा तिघांचा डबा…सासू सासरे यांचे दुपारी जेवणाचे…आणि सर्वांचा नास्ता करून जायची…

मुंबई म्हटलं की लोकलचा प्रवास आलाच …तिला घरी येई पर्यंत साडे आठ तरी व्हायचे …पण सासूबाई जेवण बनवायला हात सुद्धा लावत नव्हत्या…

निकिता सुद्धा त्रिज्जाच्या आधी ऑफिस मधून घरी यायची… पण जेवण बनवायची थोडी सुद्धा तयारी करून ठेवत नव्हती…आता तर काय वहिनी आली … जास्तच शेफारली …आधीच किचन आणि स्वयंपाक दोन्ही गोष्टीची बोंब…

आणि वहिनी आल्यावर नणदेने काम करायचे नाही…हा फार जुना विधिलिखित नियम…
बिच्चारी त्रिज्जा..!
आल्या आल्या किचन मध्ये घुसायची…सगळ्यांच्या आवडीनिवडी जपत जेवण बनवायची…

विभाताई निकिताला म्हणायच्या…आता किती दिवस उरले तुझे निकिता..! एकदा लग्न झालं अन सासरी गेली की… करावंच लागतं सगळं मुलीच्या जातीला..! आता तू काही काम करू नको…

त्रिज्जा खूपच समंजस…तीही म्हणायची… निकिता खरंच तू काही करू नको…मी आहे न… अन सासरी गेल्यावर यातून सुटका नाही ग!…
कोणी मी करते… तू हो बाजूला…असं म्हणणार पण नाही..!

आणि तीही सगळ्यांचं सगळं… नोकरी करून हसत करायची…कुठली कुरकुर नाही का आदळआपट नाही…नचिकेतला सुद्धा बायकोचे खूप कौतुक वाटायचे…सगळ्यांचं सगळं आवरून दुधाचा पेला हातात घेऊन हसतच बेडरूम मध्ये प्रवेश करायची…आणि तितकंच भरभरून त्याच्यावर प्रेम करायची…तुझी आई किंवा तुझी बहीण एका कामाला हात लावत नाही…असा चकार शब्द सुद्धा तिच्या तोंडून कधी निघाला नाही…

रविवारी सकाळी सकाळी त्रिज्जा मस्त गरमगरम बटाटेवडे करत होती…सगळे खाण्यात तल्लीन झाले होते…
तेवढ्यात त्रिज्जाच्या मोबाइलची रिंग वाजली…त्रिज्जा निकीताला म्हणाली… निकिता बघ ना जरा कोणाचा फोन तो..! माझे हात पीठाने माखले आहे..! निकिताने फोन उचलला…

समोरून तो व्यक्ती म्हणाला…हॅलो… त्रिज्जा ताई.. मी अमित बोलतोय…आणि पुढच्या वक्तीचे बोलले एकूण न घेताच बोलत राहिला…
ताई तू मला लहानपणी पाहिलं होत…नंतर बाबांची बदली नागपूरला झाली…आम्ही तिकडे राहायला गेलो…मग मी US ला गेलो…तिकडे नोकरी करत होतो…
पुन्हा आता मायदेशी आलो…इथे पुण्यालाच नोकरी करतो…आता सगळे पुन्हा पुण्यात शिफ्ट झालो…आठच दिवस झाले…

काल बाबा तुमच्या घरी जाऊन आले…काका सांगत होते…तुझी नणंद लग्नाची आहे म्हणून…
ताई मला तुझी नणंद पाहायची आहे…तसा मी तुमच्या लग्नाच्या अल्बम माधिल फोटो पहिला तिचा…फोटो वरून तरी आवडली यार तायडे तुझी नणंद…

मस्त हॉट दिसते..!

ताई आपला वशि सौ प्रभा कृष्णा निपाणेला लाव जरा…मग तो म्हणाला ताई अग काय हे..! इतक्या वेळचा मीच बडबड करतो..! आणि तू…. हु नाही का… चू नाही..! हॅलो…! ताई..! हॅलो..!

आणि निकिता लाजून हसायला लागली…मग हळूच म्हणाली…मीच त्रिज्जाची नणंद…निकिता…
सॉरी..! पण तुम्ही मला बोलायला संधीच दिली नाही…आणि वहिनीला फोन दिला…

पुन्हा ताईला सगळं सांगून फोन ठेवला…मग त्रिज्जा ने सगळ्यांना हि बातमी सांगितली…सगळेच खुश झाले…लगेच तिने बाबांना फोन केला…त्याची सगळी माहिती काढली…पुन्हा त्याला फोन करून त्याचा फोटो मागवला…

क्रमशः….

सौ प्रभा कृष्णा निपाणे                                                                                                                                      कल्याण