तेलकट त्वचेपासून सुटका

Spread the word

तेलकट त्वचा खूपच चमकत असते.तेएलकत त्वचेवर पुळ्या डाग येण्याचे प्रमाण खूप असते.आपण यासाठी खूप खर्च करतो पण अपेक्षित रिझल्ट नाही मिळत कधी कधी.तर आपण घरातच असणाऱ्या नैसर्गिक गोष्टीचा वापर करून आपल्या त्वचेचा तेलकटपणा नुसता जाणारच नाही तर स्किन सुद्धा ग्लो होण्यास मदत होणार आहे.

1) मध,साखरेचा बुरा,लिंबाचा रस एकत्र करून ओल्या चेहऱ्यावर 15मिनिट लावावा.
2)लिंबू रसात विनिगर एकत्र करून चेहऱ्यावर लावा.
3 )बेसन पी ठात हळद नुसते पाण्यात मिक्स करून त्याचा चेहऱ्यावर 15मिनिट लेप लावावा चेहरा खुलून आलेला दिसेल.
4 )काकडीचा रस लिंबुच्या रसात मिक्स करून नियमित लावल्याने चेहऱ्याचा समस्या दूर होतील.
5 )मेकअप चेहऱ्यावर टिकत नसेल तर बर्फाचा तुकडा दुधात मिसळून चेहऱ्यावर फिरवावा.मेकअप लवकर उतरणार नाही. व तुम्हाला खूप फ्रेश वाटेल.
6 )आठवड्यातून दोन वेळा दही 20मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावा.तेलकट त्वचेसाठी खूपच फायदा होईल.
7 )तांदळाचे पीठ व गुलाबपाणी एकत्र करून थोडा वेळ राहू द्या व चेहऱ्यावर ही पेस्ट चोळा.मृत पेशी निघून जाऊन तेलकट पणा जाईल.
8)मिठाचे पाणी हे नैसर्गिक रित्या शोषून घेण्याचे काम करते.त्यामुळे एका स्प्रेबाटलीत मिठाचे पाणी घेऊन ते चेहऱ्यावर स्प्रे करा.असे रोज केले तरी चालणार आहे.
9)मुल्तानी मती , चंदन पाउडर , गुलाब जल , नीम पाउडर मिळवून 20-25 मिनिटे ठेवावे.व थंड पाण्याने धुवून टाका
10 )चेहऱ्यासाठी औषधियुक्त व खास तेलकट त्वचेसाठी असणारच साबण वापरावा
11 )आठवड्यातून एकदा वाफ घ्यावी जेणेकरून चेहरा साफ होण्यास मदत होईल.
12) कोरपडीचा गर नियमित लावावा.
13 )शक्य असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी एक आवळा खावा.
14,) चेहऱ्यावरील पुळ्याना कधीच नख लावू नका फोडू नका कारण त्यामुळे कधीही न भरून येणारे खड्डे. व काळे डाग निर्माण होतात.
वरील उपाय नियमित केल्यास तेलकट त्वचेची समस्या आटोक्यात राहील.व तुमचे सौंदर्याबरोरच आत्मविश्वास ही वाढणार आहे हे निश्चितच.
…..अरुणा….