झोपताना मोबाईल जवळ ठेवणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण

Spread the word

झोपताना मोबाईल जवळ ठेवणे म्हणजे गंभीर आजारांना आमंत्रण

मोबाईल ही आता काळाची गरज आहे. यामुळे काम करताना,जेवताना,चालताना, बोलताना अगदी झोपताना देखील अनेकजणांना मोबाईल जवळ बाळगण्याची सवयच जडली आहे. पण ही सवय कॅन्सर सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते हे वेळीच ओळखणे गरजेचे आहे.

मोबाईलचा मानवी जीवनावर होणारा परिणाम यावर अनेक देशांमध्ये संशोधन करण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक संशोधनात मोबाईलचा अतिवापर हा आरोग्याला घातक असल्याचेचं समोर आले आहे. यात गंभीर आजारांपासून मानसिक आजारांचा समावेश आहे.

आंतरराष्ट्रीय कॅन्सर रिसर्च एजेंसीने दिलेल्या माहितीनुसार झोपताना मोबाईल डोक्याजवळ ठेवणे अतिघातक आहे.

कारण मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे कानात व डोक्यात ट्यूमर तयार होतो. जो पुढे कॅन्सरमध्ये रुपांतरीत होतो.

एवढेच नाही तर 2014 साली इंग्डलमधील एक्जिटर विश्वविद्यालयात झालेल्या संशोधनात मोबाईलमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक किरणांमुळे पुरुषांमध्ये नपुसंकता येते. काही पुरुषांना पँटच्या खिशात मोबाईल ठेवण्याची सवय असते. याचा थेट परिणाम शुक्राणूंवर होतो व शुक्राणूंची संख्या घटते. असे या संशोधनात आढळले होते.

तसेच गेल्या काही दिवसात झोपताना बाजूला ठेवलेल्या मोबाईलच्या स्फोटात अनेकजणांनी जीव गमावल्याच्या घटनाही घडल्या आहेत. इस्त्रायलमध्ये 2017 साली झालेल्या संशोधनात टीव्ही, संगणक व मोबाईलमधून निघणाऱ्या निळसर प्रकाशामुळे स्लीप हार्मोन मेलाटोनिनचे संतुलन बिघडते. ज्याचा परिणाम झोपेवर होतो. अशा व्यक्तींना झोप लागत नाही. रात्रभर जागरण केल्यामुळे सकाळी उठल्यावर अशा व्यक्तींना निरुत्साही जाणवतो, थकवा येतो व शरीर जड होते.