चैतन्या

Spread the word

चित्रा आपल्या रोजच्या सवयीप्रमाणे देवाची पूजा करून झाडांना पाणी घालत होती, तोंडातून श्लोक सुरू होते तेवढ्यात फोनची घंटी वाजली चित्राने फोन उचलला आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले.
फोन ठेवताच तिनं पुन्हा देवाकडे धाव घातली आणि नतमस्तक होऊन जोरात हंबरडा फोडला.

घरात का000000003

 

00000000म करणारी विमल हातातलं काम सोडून लगेच बाहेर आली आणि म्हणाली “ताई काय झालं?”

चित्राच्या तोंडून शब्द फुटेनासे झाले तिनं विमलचा हात हातात घेतला आणि तिच्या गळ्यात पडून दीर्घ श्वास घेत म्हणाली ” मी आई होणार”.
विमलला वाटलं आता कसं समजावणार ताईंना ? यातर अधून -मधून अश्या वागतातच!!!.तिनं परिस्थिती तशीच आहे असं समजून तिला “खोलीत चलून पडा ” असे सांगितले पण चित्रा ऐकायला तयार नव्हती, म्हणाली ” अगं विमल मी आई होणार” त्या… त्या आश्रमातून फोन होता… माझा नंबर लागला शेवटी…..

आता मात्र विमलच्याही डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या, गेल्या १० वर्षांपासून चित्रा आई होण्यासाठी आसुसलेली होती.
१२ वर्षांपूर्वी वयाच्या २७ व्या वर्षी लग्न झालं आणि लग्नाच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुल हवं असं तिच्या सासरच्यांचा हट्टच होता.

३/४ वर्ष वाट पाहिली तंत्र,मंत्र डॉक्टर, गोळ्या सगळं झालं पण यश आले नाही.मग चांगली सून अगदी अवदसा वाटू लागली,आधी नक्षत्रासारखी वाटणारी सून चित्रा कुठल्या नक्षत्रावर आली आमच्या घरी इथपर्यंत उच्चार झाले.

लग्नाला ७ वर्ष झाली पण घर आणि मांडी मात्र सुनी होती त्यामुळे चित्रा फार दुःखी होती, तिला कुठलाच आजार नव्हता, नवऱ्याला देखील नाही पण यश काही येत नव्हतं.

डॉक्टरांनी सल्ला दिला “तुम्ही मूल दत्तक घ्या शेवटी सगळे प्रयत्न झालेत,तुम्हाला आणि तुमच्या नवऱ्याला कुठलाच प्रॉब्लेम नाहीये पण हे आता देवाच्या हातात असल्याने वाट बघणं हेच पर्याय आहे”.

चित्रा आणि तिच्या नवऱ्यानं मूल दत्तक घेण्याचा विचार घरच्यांसमोर मांडला कुणालाच पटलं नाही कारण “कुणाचं मूल आपल्या घरात येणार”?? या विचाराने त्यांना अस्वस्थ केलं होतं.
पण चित्राच्या नवऱ्यानं जयेशनं आपलं दत्तक घेण्याचं ठाम मत दाखवून चित्राच्या आई होणाच्या इच्छेला बळ दिलं होतं. त्यानी दुसरीकडे घर घेऊन राहण्याचा निर्णय घेतला.

चित्रा आणि जयेश यांनी अनाथआश्रमांचे पत्ते काढून त्यांवर संपर्क सुरू केले, अगदी शनिवार रविवार त्यांची हीच मोहीम असायची दोघांची.सविस्तर माहिती काढून कळले की त्यांच्या सारखे अनेक लोकं आई वडील होण्यासाठी तडफडत आहे, नंबर लागलेत, किती वर्षे वाट बघावी लागू शकते सांगता येणार नाही,तरीहि दोघांनी त्या मोहिमेला सार्थक करणार म्हणून कंबरच खोचली होती, नवऱ्याची साथ होती म्हणून चित्राला खूप बळ आले होते. तिला तिचा ध्येय गाठायचा होता.तिनं देवाला सांगितले मी तुला साकडं नाही घालणार पण तू माझी जिद्द नक्की बघ आणि काय तो निर्णय दे, आज नाही उद्या दे, परवा दे किंवा अगदी वर्षभर लाव पण काय तो योग्य निर्णय दे मात्र.

आज ५ वर्ष वाट बघून इतकं सुंदर फळ मिळालं होतं,इतके वर्ष केलेले तप फलीभूत झाले शेवटी. चित्रा भानावर आली आणि नवऱ्याला फोन करून सगळं सांगितलं,त्यांनी लगेच आश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आणि मी लगेच ऑफिसमधून निघतो असे सांगितले.

घरच्यांना कळवले खरे पण त्यांना किती रस असेल माहीत नव्हते पण चित्रा आणि जयेश मात्र आज सातव्या असमानवर होते.

आश्रमात जाऊन इवल्याश्या जीवाला उराशी लावून दोघे खूप रडले आणि सगळे कागदपत्री कामं उरकून लेकीला घेऊन घरी आले.

विमलनं जय्यत तयारी केलेली, दिवे लावणं काय,रांगोळी काय सगळं अगदी सगळं लक्ष्मीपूजनागत थाट केलेला. विमलही यांच दिवसाची वाट बघत होती तिनं ही आपलं मनातलं सगळं केलं.

तानुली घरात आली, त्या दिवशीपासून कित्येक रात्र चित्रा आणि जयेश आनंदापायी झोपलेच नाही. लक्ख चैतन्य घरात आणि त्यांच्या जीवनांत आलं होतं म्हणून #चैतन्या असे नांव ठेवले आणि आपल्या आई-वडिलांना #चैतन्या दाखवायला घेऊन गेले.

घरांत शिरताच अचानक चित्रा चक्कर येवून पडली,अनेकांनी तानुलीचे पायगुण म्हणून तोंडं केली,जयेशनं त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जयेश चित्राला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा कळले चित्रा आता #आई होणार…..

चित्रा आणि जयेशनं #चैतन्याला मिठी मारून तिचे आणि देवाचे आभार मानले.

© सौं धनश्री देसाई( तोडेवाले)