चेहऱ्यावरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या, खड्डे घरगुती उपाय

Spread the word

ज्यांना अशा चेहऱ्याच्या समस्या असतील त्यांनी खालील उपाय करावेत.
१ चमचा दही व १ चमचा मसूरडाळ यांची पेस्ट तयार करून घ्यावी व ती चेहऱ्यावर लावावी. १५ ते २० मिनिट ठेवल्यावर चेहरा थंड पाण्याने धुवावा.

२. पिंपल्स किंवा डोळ्याखाली असणारे काळे डाग यासाठी कच्ची पपई किसून लावावी. फायदा होतो.

३. ज्यांना पिंपल्सचा खूप त्रास आहे त्यांनी कोरफडीच्या गराने चेहऱ्यावर फेसिअल करावे.

४. जायफळ पाण्यासोबत उगळून पिंपल्स किंवा डोळ्याभोवती असणारी काळी वर्तुळे यावरती लावावे.

५. जास्त पिंपल्स असतील तर आणखी एक उपाय म्हणजे कोबी किसून त्यामध्ये जायफळ पेस्ट मिसळावी जाडसर असा लेफ चेहऱ्यावर लावावा.

६. बाजरीच्या पिठाचा लेप चेहऱ्यावर लावण्याने चेहरा निखरतो सतेज दिसतो.

७. सुरकुत्या असणार्या चेहऱ्यावर सफरचंद किसून त्यामध्ये एक चमचा आकडी दुध टाकून पेस्ट करून घ्यावी हि पेस्ट चेहऱ्यावर लावल्याने सुरकुत्या पडणे थांबते. त्याचबरोबर केशर आणि बदामाची आकडी दुधातून तयार केलेली पेस्ट लावावी.

८. मुलायम त्वचा हवी असेल तर दोन चमचे दुध किंवा दुधाची साय यात लिंबाचा रस याचे मिश्रण करून तोंड व मानेवर थोडावेळासाठी लावावे व नंतर धुवावे. चेहर्याला ब्लीच करण्याचा याहून चांगला घरगुती उपाय कोणता नाही. यामुळे चेहरा सतेज मुलायम होतो. तेजस्वी दिसतो.

९. चेहऱ्यावर पुटकुळ्या असतील तर कार्ल्याच्या सळीने चेहरा चोळावा. यामुळे काळी वर्तुळे, पुटकुळ्या, चेहर्याचा काळवटपणा दूर होण्यास मदत होते. हा उपाय सलग पाच ते सहा दिवस करून पहा.

१०. सावळेपण दूर करण्यासाठी बाजारात अनेक क्रीम्स औषधे मिळतात पण अशी औषधे खूपच महाग व न परवडनारी असतात. पण आपण यावर घरीच उपाय केले तर खूप फायदा होतो. बादलीभर पाण्यात लिंबाचा रस टाकून त्या पाण्याने अंघोळ केल्याने त्वचेची बंद रंध्रे उघडतात व त्वचा उजर होण्यास मदत होते. हिवाळ्यात हा प्रयोग करायचा असेल तर थंड ऐवजी गरम पाणी घ्यावे आणि उन्हाळ्यात फक्त थंडच पाणी घ्यावे. सावळेपण घालवण्यासाठी आवळा पावडर मध्ये थोडे पाणी घालून पेस्ट करून ती चेहर्यावर किंवा पूर्ण शरीरावर लावल्यास फायदा होतो.