चुकलेली आज्जी

Spread the word

चुकलेली आज्जी

आज असच बाहेर जाताना, अचानक माझी नजर एका, केविलवान्या भावनेने आवाज देत असलेल्या आजीकडे गेली.
ती कोणाला तरी, एका कागदावर काही तरी लिहल्याल दाखवत होती,
मी जवळ गेलो, अण आजीची विचारपूस केली, तेव्हा समजलं की, ती कागदावर लिहिलेल्या नंबर वर फोन लावण्याची विनंती करत होती.

“आवं, येवढा फोन लावावं, माझं पोरगं हितच कूठतरी राहतयव ,?.
सकाळ ठाऊन झालं फोन करतेय पण त्यो काय फोनच चालू नाय म्हणत्य,
आजीकडच्या डायरीमधील बाकीचे नंबर वर मी फोन केला व त्यांच्या मुलाचा दुसरा नंबर मागून घेतला.
ती आजी औंध वरून आली व्हती,.
तिच्या मुलाला फोन करून मी पत्ता सांगीतला, व तो येईपर्यत मी तिथेच थांबलो, काही वेळातच आज्जीचा मुलगा आला व माझे आभार मानत, आजीला गाडीवर बसवून घेवून गेला, आपला मुलगा दिसताच तिच्या चेहचावरचा आनंद खरच बघण्यासारखा ०हता,.
माझ्या डोक्यावरून आज्जीन हात फिरवत , लय पोरा चांगल व्हईल बगं तूझ , म्हणत पाच रुपये मला, देत याचा बिस्कीट पूढा खा, म्हणत माझा निरोप घेतला, पण गाडी दुरवर जाईपर्यत तिची नजर मात्र माझ्या चेहऱ्याकडच टक लावून व्हती,
खरच मला काही वेळ माझ मन गहिवरून आलं व मला माझ्या आजीची आठवण आली.
मित्रानो चालूच्या जगात असी माणुसकी मात्र संपताना दिसून येतेय, शेवटी पैसाबरोबरच प्रेमाची आपली माणसं सोबत असणं ही काळाची गरज आहे.
आपल्या नेहमीच्याच धकाधकीच्या जीवनामधून थोडासा वेळ काढून कुठ तरी माणूसकी जपण्याचा प्रयत्न व्हायला हवा.

चित्रकार- महेश मस्के, बार्शीकर, जामगांव पां,