घरी आयुर्वेदिक उटणं कसे बनवायचे ?

Spread the word

आज काल बाजारात खूप केमिकल युक्त उटणं मिळतात त्याने त्वचेला इजा हिण्याची शक्यता असते आपण आता घरच्या घरी आयुर्वेदिक उटणं कसे बनवायचे ते आपण पाहू.

या साठी साहित्य :
२५० ग्राम (१/४ किलो) मसूर डाळ पीठ
२५ ग्राम आवळकाठी
२५ ग्राम सरीवा
२५ ग्राम वाळा
२५ ग्राम नागर मोथा
२५ ग्राम जेष्टमध
२५ ग्राम सुगंधी कचोरा
५ ग्राम आंबेहळद
२५ ग्राम तुलसी पावडर
२५ ग्राम मंजीस्ट
५ ग्राम कापूर

वरील सर्व साहित्य आयुर्वेदिक औषध दुकानात सहज मिळते.हे सर्व मिक्सर वर बारीक पूड करून चांगले मिक्स करून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे.आंघोळीच्या वेळी गुलाबजल किंवा दुधात मिसळुन लावावे.या व्यतिरिक्त फेसपॅक म्हणून ही वापरता येईल.
थंडी मुळे त्वचा कोरडी पडते फुटते अशावेळी सुगंधी साबणा ऐवजी हे घरगुती उटणं फार उपयोगी आहे.आणि बनवण्याची पद्धत पण सोपी आहे.

आपण अजून एक घरगूती पद्धतीने उटणं बनवू शकतो त्यासाठी –
१) मसूर डाळ आर्धा किलो
२) आंबे हळद पावकिलो
३) गुलाब पावडर ५० ग्रॅम
४) संत्र्याची साल ५० ग्रॅम
५) चंदन पावडर ५० ग्रॅम
६) कडूलिंबाच्या पानाची पावडर
७) वाळा ५० ग्रॅम
८) मुलतानी माती ५० ग्रॅम
९) पपई पावडर ५० ग्रॅम

वरील सर्व साहित्य सहज उपलब्ध होऊ शकते ते मिक्स करुन बरणीत भरुन ठेवावे. पाहिजे तेवढे उटणे घेऊन कच्चा दुधात पेस्ट करणे व ती सर्व अंगास लवुन आंघोळ करणे. ज्यांची कोरडी त्वचा असेल, हिवाळ्यात अंगाची फार खाज सुटत असेल तर त्यांनी हे मिश्रण लावुन आंघोळ करावी. फार चांगले असते.पपई पावडर मिळाली नाही तर पपई आणून थोडीसी मिक्सरवर पेस्ट करून उटन्यात मिक्स करून लावावी.त्वचा उजळते व छान फेशियलचा इफेक्ट येतो.मानेवर कोपरावर काखेत जिथे जिथे त्वचा काळी पडते व जास्त त्वचेवर काळे डाग पडतात त्या त्या ठिकाणी ह्या उटण्याचा वापर करा. आशा सोप्या पद्धतीचा वापर केल्यास आपली त्वचा मुलायम राहू शकते.