घरीच तयार करा आंबट-गोड मिक्स फ्रुट जॅम

 

घरीच तयार करा आंबट-गोड मिक्स फ्रुट जॅम

लहान मुलं कधी काय खाण्याचा हट्ट करतील आणि कधी काय खाण्यास नकार देतील सांगता येत नाही. बऱ्याचदा आपल्या मुलांनी काहीतरी हेल्दी खावं असं त्यांच्या आईला नेहमी वाटत असतं. पण मुलंच ती ऐकतील तर नशीबच म्हणायचं… नेमकं पालेभाज्या, फळं यांसारखं हेल्दी खाणं खाण्यासच नकार देतात. परंतु या पदार्थांना थोडसं वेगळं स्वरूप देऊन त्यांना खाऊ घालता येतं. त्यासाठी तुम्हाला फळांपासून तयार केलेला जॅम मदत करेल. हा जॅम जेवढा टेस्टी तेवढाच आरोग्यासाठीही हेल्दी ठरतो. फळं खाण्यास नकार देणाऱ्या मुलांना मिक्स फ्रुट जॅम द्या. त्यामुळे त्यांना हेल्दी पदार्थ खायला घालण्याचं तुमचं टेन्शन नक्कीच हलकं होण्यास मदत होईल. पण बाजारातून विकत आणलेल्या जॅमपेक्षा तुम्ही जॅम घरीच तयार करू शकता. जाणून घेऊयात ही खास रेसिपी…

साहित्य :

कृती:

– जॅम तयार करण्यासाठी सर्वप्रथम मिक्सरमध्ये सगळी फळं एकत्र करून त्याची पेस्ट तयार करावी.

– एका पॅनमध्ये साखर आणि तयार पेस्ट मंद आछेवर शिजवावी.

– मिश्रणाला उकळी फुटेपर्यंत हे मिश्रण सतत ढवळत रहावे.

– हळूहळू मिश्रण घट्ट होण्यास सुरुवात होईल.

– मिश्रण घट्ट होऊ लागल्यानंतर त्यामध्ये लिंबाचा रस मिक्स करावा.

– जॅम पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यावा.

– मिश्रण जॅम स्वरुपात आले आहे असं वाटलं की गॅस बंद करा.

– तयार जॅम थंड झाल्यानंतर एका हवाबंद बरणीमध्ये पॅक करून ठेवा.