घरच्या घरी सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील आणि मानेवरील हातावरील काळपटपणा(टॅन) घालवा.

घरच्या घरी सोप्या पद्धतीने चेहऱ्यावरील आणि मानेवरील हातावरील काळपटपणा(टॅन) घालवा.

महिलांमध्ये आढळणारी सामान्य पण सर्वात मोठी समस्या ती म्हणजे चेहऱ्यावर हातावर मानेवर असणारे टॅन , जे काहीही केले तरी जात नाही त्यासाठी सर्वात सोपे उपाय आम्ही घेऊन आलो आहोत नक्कीच ट्राय करा आणि चेहऱ्यावरील मानेवरील हातावरील टॅन घालवा.

1) मोनालीसा बाथ – मोनालीसा बाथ म्हणजे दह्यामध्ये अंघोळ करणे दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड असल्यामुळे जर आपण आठवड्यातून 2 वेळा याने अंघोळ केली तर तुमचा पूर्ण टॅन निघून त्वचा मुलायम आणि उजळेल.

२) बटाटा – बटाटा सुद्धा टॅनिंग साठी खूप उपयोगी आहे बटाटा मिक्सर मध्ये बारीक करून जिथे जिथे त्वचेला टॅनिंग झाली त्या त्या भागाला चोळा आणि 15 मिनिटाने थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा रोज जर हा प्रयोग केला तर नक्कीच चार दिवसात तुम्हाला फरक जाणवेल

3) दही आणि बेसन – दोन चमचे दही घेऊन त्यात एक लिंबू पिळावे आणि त्यात दही मिसळावे, नंतर याची पेस्ट चेहऱ्याला लावावी 15 मिनिटाने चेहरा धुवावा सर्वात सोपा उपाय आहे.

४) लिंबू साखर आणि थोडेसे खोबरेल तेल – मानेवर जास्त प्रमाणात जर टॅनिंग झाले असेल तर लिंबू, साखर आणि थोडेसे खोबरेल तेल मिक्स करून एक पेस्ट बनवा आणि ती मानेवर हळू हळू चोळा.

5) मध आणि पपई – पपई मध्ये सुद्धा ऍनजाइम् नावाचा घटक असतो जो चेहऱ्याला, मानेला आणि हात उजळ आणि टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करतो, तसेच चेहऱ्यावरील काळे डाग सुद्धा यामूळे दूर होतात. आठवड्यातून मध आणि पपई ची पेस्ट जर चेहऱ्याला आणि मानेला लावली तर नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

6) लिंबू आणि काकडी – चेहरा जर जास्तच उन्हामुळे काळपट झाला असेल तर
लिंबू मध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असल्यामुळे त्वचा उजळ करण्यास मदत होते, तसेच लिंबूमध्ये अँटिऑक्सिडेंट असल्यामुळे सुर्याच्या किरणांमुळे झालेले त्वचेचे नुकसान कमी करण्यास मदत होते. काकडी शीत असल्यामुळे त्वचेला थंडावा देते त्यामुळे या दोन्हीचा रस मिक्स करून चेहऱ्याला मानेला हाताला लावल्यास नक्कीच त्याचा उपयोग होऊन त्वचा उजळेल पण ही प्रक्रिया दररोज करायला हवी.

तर ह्या टिप्स वापरा आणि त्वचेची काळजी घ्या.