‘गर्भपिशवी काढावी की काढू नये?

  • गर्भपिशवी:
    ‘गर्भपिशवी काढावी की काढू नये?’ याबाबत महिलांमध्येच नाही तर कुटुंबालाही प्रश्न पडत असतो…..

रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव हाेत असेल तर गर्भपिशवी काढावी लागते.महिला ह्या खूप सारे आजार अज्ञान अभावी अंगावरच काढत असतात.व त्यातही खूप त्रास झाला तरच त्या डॉक्टरकडे उपचारासाठी जात असतात.
‘गर्भपिशवी काढावी की काढू नये?’ याबाबत महिलांमध्ये काही समज-गैरसमज आहेत, त्यासंबंधीची माहितीसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज औरंगाबादच्या माजी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अर्चना मोहगावकर यांच्या म्हणण्यानुसार
1- गर्भपिशवी का काढवी लागते?
1. हार्मोन्सचे संतुलन िबघडले तर रक्तस्राव अनियिमत होतो रक्तक्षय होतो म्हणून गर्भपीशवी काढावी लागते.
2. गर्भपिशवीत गाठ झाली असेल तर ती गर्भासारखी वाढत जाते. यामुळे रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो.
3. महिलांनी वयाची ४० शी गाठली की मासिक पाळीत अनियमितता येते. हा काळ रजोनिवृत्तीचा असतो. काही महिलांना रक्तस्राव जास्त होतो. रजोिनवृत्ती आल्यानंतरही रक्तस्राव होणे, मासिक पाळीच्या वेळी जास्त रक्तस्राव होणे, पोटात दुखणे, गाठ होणे , लघवी करताना त्रास होणे, लैंगिक संबंधाच्यावेळी त्रास होणे यामुळे गर्भाशयाचा कर्कराेग होण्याचा धोका असतो. त्यामुळे गर्भपिशवी काढावी लागते.
मासिक पाळीचा अनियमितपणा
असंतुलित हार्मोन्स,कॅन्सर (गर्भपिशवीच्या आतील भागात किंवा गर्भपिशवीच्या मुखाचा),टयूमर यामुळे देखील होतो.
गर्भ पिशवी ही काढण्याचे शकतो जेव्हा
हार्मोन्सचा असंतुलितपणा काही काळच असतो. तो नियमित होतो.
तसेच मासिक पाळी गेली की सर्व नाॅर्मल होते आणि रजोनिवृत्ती आली की सर्व साधारण स्थितीला येते यामुळे गर्भपिशवी काढायची गरज पडत नाही.