गंगा जमुना सरस्वती (वेश्या व्यवसाय नागपूर )

Spread the word

नागपूरच्या गंगा जमुना नगरातील कथा आहे ही,
दोन वर्षा पूर्वी मी नागपूरला होतो कामानिमित्त, तिकडं काहीं मुलांचा ग्रुप ह्यावर काम करतोय, तसे ओळखीचे खूप लोक आहेत जे ह्यावर काम करतात, गँगा जमुना नगर हा परिसर तसा बुधवार पेठे पेक्षा मोठा आहे, तिथे आता तरी 3500 पेक्षा जास्त मुली महिला वेश्या व्यवसाय करतात, दिवसाला तिथे 13 ते 14 हजार लोकांची ये जा असते असा एक अंदाज दर्शवला जातो, असेलही, शरीराची भूक भागवायला दररोज कित्येक जण जात असतीलच..
तर एक कॉलेजच्या मुलांचा एक ग्रुप ह्यावर इथे काम करायची इच्छा ठेवून माझ्याकडे आला होता, त्यांना सगळी सविस्तर माहिती मी सांगितली होती, कोणते प्रश्न विचारायचे कोणते नाही, काय गोष्टी तिथे वापरायच्या बोलताना, नोंदनि वैगेरे सगळं सांगितलं होतं, एक सरस्वती नावाची बाई तिथे वेश्या व्यवसाय करत होती, तिला दोन मुली होत्या आणि एक मुलगा वय तसं 35 ते 40 असेल, अंगा पिंडयाने भक्कम असणारी बाई, हा व्यवसाय का करत असेल इथे, नाव तर सरस्वती आहे,आणि इथं..? मनात प्रश्न निर्माण झाला, बोलायचं ठरवलं मी त्यांच्याशी आणि बोलायला गेलो, बोलायचं 500 रुपये घेणार तरच बोलायला ये नाहीतर बोलायला येऊ नको, धंद्याचा टायमिंग आहे, म्हणत तिने माझ्या आणि मित्रासमोर आपला परकर वर केला, आता मला पैसे देणे भागच होते, मी पैसे दिले आणि बोललो ताई फक्त थोडा वेळ बोल माझ्या प्रश्नांची उत्तरे दे, टचकन डोळ्यात पाणी आलं तिच्या, तिथे येऊन ताई म्हणणारा मी बहुदा पहिला असेंन तिला असो ,
सरस्वती एका खेडेगावात राहायला असणारी बाई, नवऱ्याने सोडायचं कारण की सासऱ्याने तिच्यावर अत्याचार केला आणि तिने आवाज उठवला तर तू वडिलांवर आरोप केलास कसा म्हणून झालेली सोडचिट्टी, पण तिच्यावर खरंच सासऱ्याने अत्याचार केला होता हे गावभर झालं होत, बलात्काराची केस तिने दाखल केली आणि तिला घर सुटलं, माहेरी भावाची बायको येऊ देईना घरी, दोन मुलींना घेऊन आणि एक लहान पोरग घेऊन ती नागपूर ला आली, दोन दिवस स्टेशन लाच झोपली, कोणीतरी काम देतो ह्या आशेने आम्हाला इथं आणून सोडलं, अगोदर काही दिवस मी घरकाम करायची, त्याने राहायला जागा दिली, पण त्यांची बदली झाल्यावर मात्र आम्ही परत उघड्यावर आलो, आता काय करायचं ह्याच विचारत होते, तेव्हा एका बाईने इथं आणून सोडलं जमुना नगरात, खोली पण मिळाली आणि इथं काम पण मिळालं, माझ्या दोन्ही पोरींना शाळेत शिकायला पाठवत होते पण ते सगळं थांबलं, मी इथं अडकून पडले, आता भाकरी साठी दररोज कोण न कोण उरावर झोपत असतो, आणि पोटाची खळगी भरावी म्हणून मी स्त्रीची जागाच त्याला बहाल करत असते, माझं एक देवाने बाई बनवून पाठवलय ते बरं केलंय, स्त्री सुख मिळावं म्हणूंन लाळ गाळत कित्येक लोक इथं येत असतात, ते त्यांची शरीराची भूक भागवतात आणि आमची पोटाची, मी ह्यात परिस्थितीने पडले समाजाने मान्य केलं नाही, एक बलात्कारी बाई म्हणून त्यांनी हिनवले कायम, माझ्या पोरींना आणि पोरानं पण जवळ केलं नाही कोणी, पण त्यांना ह्यात पडू द्यायचं नाही, त्यांना त्यांचं जगणं जगायचा अधिकार आहे आणि मी त्यांना तो नक्की देणार….
सगळं लक्षात आलं होतं काहीतरी केलं पाहिजे, माझा नंबर देऊन मी दोन दिवसांची मुदत घेऊन आलो, आता काही करता येईल का त्यांच्या साठी, जुई ला फोन केला माझ्या मैत्रिणीची आश्रम शाळा आहे तिकडे काही व्यवस्था होते का बघितले तर तिथे कागदपत्र अडचण येत होती, पण थोडं फोर्स करून मी त्यांची ओळख लपवून त्यांना घ्या तिथे असा हट्ट केला होता शेवटी त्यांनी नाकारले ऍडमिशन, पण दुसरीकडे टीम ने व्यवस्था केली होती जिल्हा दुसरा बघायचं जिकडे कोणी ओळखणार नाही अश्या ठिकाणी त्यांना शिफ्ट करायचं ठरवलं, त्यांना फोन करून दोन्ही पोरींना आणि पोराला घेऊन यायला सांगितलं, शाळेत जाऊन त्यांच ऍडमिशन मित्रांनी करून दिलं, सगळं शालेय साहित्य आम्ही पुरवले, अगदी शाळेचा गणवेश पर्यन्त सगळं मिळवून दिल, पोरींना आणि त्या पोराला जगायला नवीन आयुष्य दिलं, सरस्वती ताईंच्या डोळ्यांचं पारणं फिटलं आपल्या पोराना त्यांना शाळेत बघायचं होत, त्या तिथून बाहेर पडू शकतील की नाही हे माहित नाही पण त्यांच्या लेकरांना मात्र आम्ही बाहेर काढलेच शेवटी, ह्यात मला एक गोष्ट जाणवली की, समाज लवकर मान्य करत नाही त्यांना आणि कोणत्याही गोष्टीला समाजच जास्त कारणीभूत असतो मग ते वाईट असो किंवा चांगली असो, गंगा जमुना ह्या भारतातील पवित्र नद्या म्हणून ओळखल्या जातात, त्यात आता सरस्वती देखील सामील झाली आहे, हे एक विदारक सत्य आहे,
गंगा-जमुना-सरस्वती
सुहासदाभाडे
माणुसकीच्याशोधात
नागपूरचीटीम
ऑक्सिजन
एकलढादेऊया
चलाजीवनघडवूया