खा अंकुरित धान्य….उत्तम आरोग्यासाठी ..

Spread the word

 

खा अंकुरित धान्य….उत्तम आरोग्यासाठी ..

जेवणात अंकुरित म्हणजे मोड आलेल्या धान्याचा समावेश केल्यास विविध आरोग्यदायी फायदे होऊ शकतात. अंकुरित धान्यामध्ये उपलब्ध असलेले स्टार्च, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि माल्टोजमध्ये बदलतात. यामुळे या धान्यांची चव वाढते, तसेच यामधील पाचक आणि पोषक गुणांमध्ये वृद्धी होते. अंकुरित धान्य शरीरासाठी फायदेशीर असते हे सर्वांनाच माहिती आहे परंतु आज तुम्हाला यामधील काही खास गुणांची माहिती देत आहोत. कदाचित हे खास औषधी गुण तुम्हाला माहिती नसावेत….

1. मोड आलेल्या गव्हामध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. व्हिटॅमिन ई त्वचा आणि केसांना हेल्दी ठेवते. याच्या नियमित सेवनाने शरीर उर्जावन राहते. किडनी, ग्रंथी आणि तांत्रिक तंत्राची मजबुती तसेच नवीन रक्त कोशिकांचे निर्माण करण्यातही या धान्याची मदत होते. अंकुरित गव्हामध्ये उपलब्ध असलेल तत्त्व शरीरातील अतिरिक्त वसा शोषून घेण्याचे काम करतात.

2. अंकुरित भोज्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. हे शरीराला फिट ठेवतात. यातून मिळणार्‍या प्रोटीनमुळे हाडे मजबूत होतात.

3. अंकुरित गव्हामध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. याचे सेवन केल्याने पाचन प्रक्रिया सुधारते. याच्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठता, गॅस, एसिडिटी यासारख्या समस्या नष्ट होतात.

4. अंकुरित धान्यामध्ये अँटीऑक्सीडेंट, व्हिटॅमिन ए, बी, सी आढळून येते. यामध्ये फॉस्फरस, मॅग्नेशियम, आयरन आणि झिंक मिळते.

6. अंकुरित मुग, मसूर, हरभरे शरीरातील ताकद वाढवतात. अशी कडधान्ये खाल्ल्याने शरीरात असणारे हानिकारक अँसिड्स सहज बाहेर काढण्यास मदत मिळते. या आहारामुळे तुम्ही अनेक आजारांपासून लांब राहू शकता.

5. अंकुरित धान्याने शरीरातील मेटाबॉलिझम स्तर वाढतो. हे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर काढण्यास मदत करते. अंकुरित गव्हाचे दाणे चावून-चावून खाल्ल्यास शरीरातील पेशी शुद्ध होतात. यामुळे नवीन पेशी निर्माण होण्यास मदत होते.