कोबीची कोशिंबीर

 

कोबीची कोशिंबीर

कोबी सहसा कोणी खात नाही, पण आरोग्यसाठी कोबी खूप उपयुक्त आहे. जर कोबीची कोशिंबीर लहान मुलांना, मोठ्यांना दिले तर ते आवडीने खातील. आणि एक चांगला पदार्थ त्यांच्या पोटात गेला याचे तुम्हाला समाधान मिळेल.

साहित्य –
एक मोठी वाटी बारीक चिरलेला कोबी,
अर्धी वाटी दही,
एक बारीक चिरलेली हिरवी मिरची,
चार चमचे शेंगदाण्याची जाडसर कूट,
बारीक ठेचलेल्या चार लसुनच्या पाकळ्या,
बारीक चिरलेली कोथिंबीर,
चवीप्रमाणे मीठ.

फोडणीसाठी – तेल, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता.

कृती – कोबी, दही, हिरवी मिरची, कोथिंबीर, शेंगदाण्याचा कूट, लसुन, मीठ या सर्व गोष्टी एकत्र करून घ्यावे. आता फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी टाकून तडतडू द्यावे नंतर हिंग कढीपत्ता टाकून फोडणी कोशिंबीर मध्ये मिक्स करून घ्यावे.