केळीच्या पानांवर जेवण करणं ठरतं फायदेशीर!

Spread the word

…म्हणून केळीच्या पानांवर जेवण करणं ठरतं फायदेशीर!

केळीच्या पानांना धार्मिक महत्त्व असून देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तसेच पूजेसाठीदेखील यांचा वापर करण्यात येतो. भारतामध्ये केळीच्या पानांवर जेवण वाढण्याची फार जुनी परंपरा आहे. विशेषकरून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये केळीच्या पानांवर जेवण करणं आरोग्यासाठी फायदेशीर समजलं जातं. या पानांचा उपयोग फक्त जेवण्यासाठीच नाही तर जेवण शिजवण्यासाठीही करण्यात येतो. या पानांना सर्वाधिक हायजेनिक आणि आरोग्यदायी मानण्यात येतं. या पानांवर एकाच वेळी सर्व पदार्थ ठेवता येतात. परंतु, तुम्ही कधी विचार केलाय का? याच पानांचा जेवण वाढण्यासाठी उपयोग का करण्यात येतो?

केळीच्या पानांवर जेवण्याचे फायदे :

अ‍ॅन्टीऑक्सिडंट

केळीच्या पानांमध्ये प्राकृतिक अ‍ॅन्टीऑक्सिडंट म्हणजेच पॉलीपेनॉल्स आढळून येतात. हे अ‍ॅन्टीऑक्सिडंट्स अनेक वनस्पतींपासून प्राप्त होणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये आढळून येतात. जर तुम्ही केळीच्या पानांवर जेवण वाढत असाल तर ते पदार्थ केळीच्या पानांमधील अ‍ॅन्टीऑक्सिडंट त्या पदार्थांमध्ये शोषले जातात. जे आपल्या शरीराचा अनेक आजारांपासून बचाव करतात.

जेवणाची चव वाढवतात

केळीच्या पानांवर एक प्रकारची वॅक्स कोटींग असते. ज्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची चव असते. यांवर गरम पदार्थ वाढल्याने पानांवर असलेलं वॅक्स कोटींग विरघळून जातं आणि पदार्थांची चव वाढवतात.

हायजेनिक

केळीच्या पानांना स्वच्छ करण्यासाठी अधिक मेहनत घेण्याची गरज नसते. ही फक्त पाण्याने स्वच्छ धुतल्यास लगेच स्वच्छ होतात. सामान्य भांडी स्वच्छ करण्यासाठी साबणाचा वापर करण्यात येतो. ज्यामुळे त्यांच्यामध्ये काही जंतू राहण्याची शक्यता असते. परंतु केळीच्या पानांवर जेवल्याने तुम्हाला फायदाच होतो.

केमिक्सपासून सुटका

तुम्ही डिशवॉशरमध्ये भांडी स्वच्छ करा किंवा स्वतःच्या हाताने साबणाच्या मदतीने भांडी स्वच्छ करा. या केमिकल्सचे ट्रेसेस तुमच्या भांड्यांवरही तसेच राहतात. केळीच्या पानांवर कोणतेही केमिकल्स नसतात आणि आरोग्यासाठीही घातक नसतात.